Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 1 ते 7 डिसेंबर 2019

Webdunia
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (16:19 IST)
मेष : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. कामाचा ताण जाणवणार नाही. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपली मते ठाम ठेवलीत तरच आपला निभाव लागणार आहे. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. 
 
वृषभ : प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल. उत्तरार्धात जूनी येणी वसूल होतील. ज़वळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.  
 
मिथुन : लेखक, शिक्षकांकडून चांगली कामगिरी होणार आहे. मन शांत राहिल्याने त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आपल्या राशीच्या लाभस्थानातून होणारे चंद्रभ्रमण आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे राहील. गुंतवणूकीतून लाभ देणारे राहील. सामाजिक कार्यात यश मिळेल, कौतुक होईल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. 
 
कर्क : सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी-व्यवसायाच्यादृष्टीने भरभराट करणारे ग्रहमान राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील.
 
सिंह : आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. स्थितप्रज्ञ राहून महत्त्वाचें निर्णय घ्या. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल. आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील. 
 
कन्या : बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. सार्वजनिक कामात पतप्रतिष्ठा लाभेल. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. परदेशी जाण्याचा प्रयत्न करणार्‍या संधी उपलब्ध होईल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. कामाचा ताण व दगदग जाणवण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे अथवा प्रवास तूर्त पुढे ढकलावेत. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील.
 
तूळ : आपल्या कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न संततीच्या मदतीने कराल.जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. स्वत:ची मत, अपेक्षा, इच्छा काबूत ठेवून मगच महत्वाचे निर्णय घ्यावेत. दुसर्‍याबद्दलचे मत व्यक्त करताना त्यांची बाजून ऐकून घ्या. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. भागीदारी व्यवसायातून जबाबदारीची कामे स्विकारावी लागतील. वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. कर्तव्य भावना ठेवून वागावे.अनेकांचे सहकार्य लाभेल.
 
वृश्चिक : वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या मताशी ठाम राहीलात तर परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल. धाडसी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.
 
धनू : धाडसी निर्णय घेतले जातील. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. भागीदारी व्यवसायातून आपणांस चांगला फायदा होईल. कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल.
 
मकर : उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, आपला आत्मविश्‍वास व मनोबल उंचावेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल.
 
कुंभ : कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. ध्यानधारणेत प्रगती होईल. पुढे घडणार्‍या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. महिलांनी जपजाप्याकडे जास्त लक्ष द्यावे. आपल्या सहकार्‍यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल.
 
मीन : घरातील वातावरण आनंदमयी होईल. स्थितप्रज्ञ राहून आपली सर्व कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जूनी येणी वसूल होतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख