Marathi Biodata Maker

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: मिथुन

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:24 IST)
ह्या राशीच्या जातकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करण्याची गरज आहे अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
जानेवारी ते मार्च ही कालावधी आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या उत्कृष्ट ठरू शकते. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून डिसेंबर महिनाही आपणास खूप चांगला असू शकतो. मे महिन्याच्या मध्य काळात आपणास गुप्त धनाची प्राप्ती होऊ शकते.
 
मार्च ते एप्रिल महिन्यात पैशाचे अनपेक्षित नुकसान आणि नफा पण संभवतो. जानेवारी महिन्यात आपणास आर्थिक आघाडीवर आव्हानांना सामोरा जावं लागणार आहे. ह्या वर्षी आपल्याला आर्थिक आघाडीवर सावध राहावे लागणार आहे आणि विचारपूर्वक पैसे गुंतवावे लागणार. 
 
ह्या वर्षी आपणास वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. अनपेक्षित धनलाभ होईल. सप्टेंबरच्या अखेरीस आपल्या खर्चांमध्ये अनपेक्षित वाढ होईल. यामुळे आपल्याला काही आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. म्हणूनच, 
 
योग्य वेळी पैशाचा उत्तम वापर करा आणि ते मिळविण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये.
 
ह्या वर्षी परदेशी संपर्कातून लाभ होतील जेणेकरून आपली आर्थिक स्थिती बर्‍याच प्रमाणात मजबूत होईल. ह्या वर्षी आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर खर्च करावं लागेल. शेअर्स, सट्टाबाजार, लॉटरीच्या नादी लागू नका. 

अन्यथा तोटा संभवतो. आर्थिक व्यवहार विचारपूर्वकच करा. उसने पैसे देऊ नका, परत मिळणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी खिचडी खाल्ल्याने शनिदेव का प्रसन्न होतात? ज्योतिषशास्त्रीय कारणे आणि फायदे जाणून घ्या

Gupt Navratri 2026 गुप्त नवरात्र कधी सुरू होते, ३ रहस्यमय गोष्टी जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments