rashifal-2026

वृश्चिक राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:22 IST)
वृश्चिक कार्ड - The Magician
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप चांगले परिणाम देणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. नवीन व्यवसाय आणि नवी नोकरी आपणांस नव्या उंचीवर नेतील. एकंदरीत हे वर्ष आपणांस संस्मरणीय असेल. यंदा आपल्या कार्यशैलीत लक्षणीय बदल होतील. अनपेक्षित यश संपादन कराल. व्यवसाय करणाऱ्यांना नाव लौकिक मिळेल. भागीदारीत व्यवसाय करू शकता. कुटुंबात गैरसमज होण्याची शक्यता आहे पण हे तात्पुरतींचे असतील. कोणावर ही अती विश्वास ठेवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदारा सोबत काही योजना आखू शकता. एकंदरीत हे वर्ष आपणांस अनुकूल जाणार आहे.
 
करियर :-  आपल्या नोकरीत आपणांस यश मिळेल. ज्या योजना बनवाल त्यावर यशस्वीरीत्या कार्य कराल. आपल्या वेतनवाढींचे योग आहे. 
 
व्यवसाय :- आपणांस भागीदारीतून मोठा फायदा होणार आहे. आपण आपल्या व्यवसायात यशस्वी व्हाल. हे वर्ष आपणांस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक असणार आहे. 
 
कुटुंब :- कौटुंबिक संभाषण स्पष्ट ठेवा. आपल्याला कौटुबियांचे सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 
 
आरोग्य :- व्यायाम करताना काळजी घ्या. प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. स्नायू संबंधी त्रास उद्भवतील.
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- आपल्या जोडीदाराची आपणांस चांगली साथ आहे, ते आपणांस प्रेरित करतात. त्यामुळे आपल्या यशाचे श्रेय आपण त्यांना देऊ शकता. या वर्षी आपण जोडीदारास भरपूर वेळ द्याल, त्यामुळे आपण आनंदित राहाल. 
 
आर्थिक स्थिती :- ह्या वर्षी आपली आर्थिक स्थिती चांगली राहणार असून अनपेक्षित लाभ मिळतील. नव्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यातून आपले उत्पन्न वाढतील. आर्थिक बाबतीत हे वर्ष भरभरून मिळण्याचे आहे. आपली चांगली बचत होईल. 
 
टिप :- प्रगती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी घराच्या वायव्य दिशेस फेंग शुई ठेवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणे योग्य आहे का?

शंकराचार्य कसे बनतात? नियम काय आणि सध्या किती शंकराचार्य आहेत?

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

रोहिणी व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments