Marathi Biodata Maker

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: वृषभ

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2019 (17:02 IST)
वृषभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष प्रेमाच्या बाबतीत अनुकूल सिद्ध होईल आणि आपण आपल्या पार्टनरसोबत आनंदात वेळ घालवाल. आपण आपल्या पार्टनरप्रती समर्पित आणि निष्ठावान राहाल आणि त्यांच्याद्वारे दिलेला सल्ला खुल्या मनाने स्वीकार कराल. फक्त आपल्या नात्यात अहंकार येऊ नये याबद्दल काळजी घ्यायची आहे कारण अहंकार असल्यास प्रेम टिकत नाही. जर आपण असे करण्यात यशस्वी ठराल तर आपल्यात प्रेमात पारदर्शकता येईल आणि ही गोष्ट आपल्या 
 
पार्टनरला नक्की पसंत पडेल. वर्ष 2020 च्या मध्य काळात आपण प्रेम जीवनात पुढे वाढाल आणि आपल्या जीवनात शांती, सद्भाव, रोमांसची भावना वाढेल. या दरम्यान आपण एकमेकांकडे अधिक आकर्षित होत असल्याचे जाणवेल परंतू सभ्यपणे वागणे नेहमीच योग्य ठरतं.
 
या दरम्यान स्वतः:ला पार्टनरच्या गरजेप्रमाणे वागणे योग्य ठरेल. वर्षाच्या शेवटी आपल्याला प्रेम जीवन आणि भविष्याबद्दल महत्त्वपूर्ण निर्णयावर पोहचण्याची गरज भासेल. आपण सिंगल असाल तर जीवनात विशेष व्यक्ती प्रवेश करेल. आपण आपल्या नात्याला एक नवीन सर्जनशीलता देऊन नातं घट्ट कराल. जर आपण रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या नात्यात स्थिरतेला महत्त्व देत आपल्या पार्टनरचे सर्व रुसवे-फुगवे दूर करून मधुर संबंध स्थापित कराल.
 
आपल्यासाठी फेब्रुवारी हा महिना योग्य ठरणार आहे आणि या दरम्यान आपण एक रोमँटिक जीवनाचा आनंद घ्याल. आपला आपल्या पार्टनरप्रती आकर्षण वाढेल. या व्यतिरिक्त जून, जुलै आणि सप्टेंबर महिना देखील लव्ह लाईफसाठी योग्य ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sati Baijabai Yatra 2026 श्री गजानन महाराजांच्या परम् भक्त संत बायजाबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments