Festival Posters

साप्ताहिक राशीफल 16 ते 22 ऑगस्ट 2020

Webdunia
रविवार, 16 ऑगस्ट 2020 (09:08 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील व व्यवसाय क्षेत्रातील योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपातच राहू शकतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपेक्षित यश समोर दिसेल. अंतिम चरणात मित्रमंडळींचे सहकार्य वेळेवर मिळेल. तसेच आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. हातात पैसा खेळताच राहू शकेल. 

वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊ शकेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे करार व्यवहार गतिमान होतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना प्राप्त होतील. मनावरील काळजी दूर होऊ शकेल. 

मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. त्यामुळे मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाऊन मानसन्मान योग घडून येईल. 

कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी तो लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात सर्वत्र विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळून उत्साह वाढेल. 

सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळीच्या कारवाया काही प्रमाणात कमी होतील. त्यामुळे आपला यशाचा मार्ग खुलाच राहून नेत्रदीपक प्रगती राहून काळजीचे सावट दूर होईल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल. भागीदारी क्षेत्र वादविवादमुक्त स्थितीतच राहू शकेल. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिद्ध होऊ शकेल. 

कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येईल. आर्थिक स्थिती मजबुतीच्याच शिखरावर राहून आर्थिक चिंता मिटण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. आरोग्याच्या बहुतेक समस्या मिटतील. निरागस आरोग्याचा लाभ मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. मानसिक शांतता लाभेल. 

तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार व वार्ता हाती येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होण्याच्या मार्गावर राहील. अंतिम चरणात संततीबाबत असणारी चिंता मिटेल व आर्थिक आवक विविध मार्गावरून राहील. त्यामुळे आर्थिक टंचाई जाणवणार नाही व हातात पैसा खेळताच राहू शकेल. 

वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्गाकडून अपेक्षित स्वरूपाचे सहकार्य लाभेल. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून यथायोग व उचित मानसन्मान सोहळा आयोजित केला जाईल. सर्वत्र अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात कौटुंबिक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. काही बाबतीत दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साहवर्धक स्थिती राहू शकेल.

धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक अस्थिरता राहील. इतरांकडून येणे असलेला पैसा हाती येण्यास विलंब व अडथळे निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरू शकेल. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. क्रीडा क्षेत्रात नवीन डावपेचाचा केलेला प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावरच राहील व बक्षीसपात्र स्थिती कायम स्थितीतच राहील. 

मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कार्य क्षेत्रातील स्थगित व अपूर्ण योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावरच राहील. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचा ठरेल व यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल. कर्ज व्यवहार प्रकरणे या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहतील. काळजीचे सावट वाढू शकेल. 

कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील. विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. अनाहुत काळजी वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी सुधारेल व मनाला दिलासा मिळेल. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. इतरांबरोबर असणारे मतभेद मिटण्याच्या मार्गावर राहतील. 

मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळेल. अचानक धनलाभ योग आहे. लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात काही प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागेल व परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळणे शक्यतेच्या पलीकडेच राहण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Baby Names on Lord Shiva महाशिवरात्रीला जन्मलेल्या बाळांसाठी निवडा ही 'शिवमय' नावे

Kumbh Sankratni 2026 : १३ फेब्रुवारी रोजी कुंभ संक्रांती: शुभ वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या

भगवान शिवाची १२ नावे कोणती?

Mahashivratri 2026 Wishes in Marathi महाशिवरात्री शुभेच्छा संदेश

Mahashivratri Special Recipe झटपट बनवा उपवासाची कचोरी

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

पुढील लेख
Show comments