Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महान व्यक्तिमत्वाला मुकलो

--अजित पवार

Webdunia
MH GovtMH GOVT
थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या निधनामुळे देश एका महान व्यक्तिमत्वाला मुकला आहे, असे जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. बाबा आमटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच आपल्याला तीव्र दु:ख झाल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात,` बाबा आमटे यांनी आपल्या कृतीतून अवघ्या देशापुढे एक आदर्श घालून दिला. त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे. कुष्ठरुग्णांना समाजात मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी केलेल्या विधायक कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी वसवलेले आनंदवन कुष्ठरुग्णांच्या जीवनात खराखुरा आनंद देणारे आणि जीवनाप्रती आशा पल्लवित करणारे आहे.

बाबा आमटे यांनी सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी काढलेली भारत जोडो यात्रा देशांतील प्रत्येक नागरिकांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सामाजिक जीवनात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे श्री. पवार यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

LIVE: गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पराभूत झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमला घेऊन रडतात, भविष्यात आणखी निवडणुका हरतील-चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार शपथविधी

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र, आज दिल्लीत बैठक

Show comments