लिपस्टिक लावण्यापूर्वी कंसीलरचा उपयोग करावा. ओठ मोठे दिसण्यासाठी लिप लाइनर लावावे. लिप ग्लॉसच्या मदतीने ओठांचा आकार वाढेल. लिपस्टिक लावल्याने महिलांच्या चेहऱ्यावर ग्लो येतो. ओठांवर लिपस्टिक लावणे ही एक प्राचीन कला आहे, जी आजच्या काळात बदललेली असून विकसित झाली आहे. आजच्या काळात लिपस्टिक नुसती ओठांना रंगवत नाही तर त्यांचा आकार मोठा दिसण्याकरिता मदत करते. चला जाणून घेऊ या तुम्ही लिपस्टिकच्या मदतीने ओठांना मोठा आकार कसा देऊ शकतात.
1. लिपस्टिकची शेड-
ओठ मोठे दिसण्यासाठी योग्य लिपस्टिकची निवड करणे महत्वाचे असते. काही महिला डार्क कलरची लिपस्टिक लावतात. ज्यामुळे ओठ मोठे दिसतात. तसेच याशिवाय मैट फिनिश लिपस्टिक ओठ मोठे दिसण्यासाठी मदत करते. न्यूड कलरने पण तुमचे ओठ मोठे दिसण्यासाठी मदत होईल.
2. लाइनरचा उपयोग-
ओठ मोठे दिसण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे लिपलाइनरचा उपयोग करा. लाइनरला योग्य प्रकारे लावून तुमचे ओठ मोठे दिसायला मदत होईल.
3. लिप ग्लॉस-
तुमचे ओठ मोठे दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर लिप ग्लॉसचा नक्की उपयोग करा. लिप ग्लॉसच्या मदतीने तुमचे ओठ चमकदार आणि सुंदर दिसतील. तसेच ओठांचा आकार देखील वाढलेला दिसेल.
4. कंसीलर लावा-
कोणतीही लिपस्टिक लावण्यपूर्वी ओठांना कंसीलर लावा. कंसीलरच्या मदतीने लिपस्टिक तुमच्या ओठांवर खुलून दिसेल. सोबत तुमचे ओठ पहिल्यापेक्षा सुंदर दिसतील.
या साध्या सोप्या उपायांनी तुमचे ओठ मोठे आणि सुंदर बनू शकतात. तसेच चांगली डाइट, चांगल्या सवयी, आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन केल्याने ओठ देखील चमकदार आणि आरोग्यदायी राहतील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.