Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केळीच्या फुलात सौंदर्य खुलवण्याचा खजिना, या प्रकारे वापरा

केळीच्या फुलात सौंदर्य खुलवण्याचा खजिना, या प्रकारे वापरा
, बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (11:14 IST)
केळीचे फुल हे त्वचे साठी खूप फायदेशीर मानले जाते. केसांची निगा राखण्यासाठी केळीच्या फुलांचा वापर करता येईल. केसांचा कोंडा कमी करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ह्याची पेस्ट बनवून हेअरपॅक लावल्याने केस चांगले होतात. 
 
आपल्याला केळ्याचे गुणधर्म तर माहीतच आहे. सर्व पोषक घटकांनी समृद्ध असलेलं केळ आपण आवडीने खातो. त्यामुळे आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. केळ हे सौंदर्यासाठी देखील लाभदायी असतं. 
 
बऱ्याच सौंदर्य उत्पादक मध्ये देखील केळ वापरतात. केळ हे त्वचे आणि केसांसाठी फायदेशीर आहे. केळ्यासह त्याचा फुलाचा ही वापर केल्याने त्याचे फायदे दुपटीने वाढतात. बऱ्याच सौंदर्य उत्पादक मध्ये केळीचे फुलाचा समावेश असतो. 
 
हातांची काळजी घेतं -
काही जण आपल्या चेहऱ्यासाठी तर बरेच काही करतात पण आपल्या होता-पाया कडे दुर्लक्ष करतात. असे करू नये. परिणामी हात पायांची त्वचा काळी पडते आणि निर्जीव दिसते. आपल्या हाता-पायांच्या त्वचेची निगा ठेवण्यासाठी आपण केळ्याच्या फुलाचा देखील वापर करू शकता. या पासून बॉडी लोशन आणि क्रीम तयार करतात. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट एजेंट गुणधर्म असल्यामुळे सरत्या वयाची लक्षणे, सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
 
डेड स्कीन काढण्यासा मदत करतं-
आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी अनेक स्क्रब वापरण्यात येतात. त्यापैकी एक असत जरदाळू आणि अक्रोड चे स्क्रब. या मुळे आपल्या चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला इजा होऊ शकते. या ऐवजी बारीक दाणे असलेले स्क्रब वापरावे केळीच्या फुलाचे स्क्रब करून आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. या साठी चेहऱ्या आणि मानेवर हे स्क्रब लावून हळुवार हाताने मसाज करा आणि 10 मिनिटानंतर चेहरा धुऊन घ्या. यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि तजेल होते. 
 
बाम - 
केळीच्या फुलामध्ये इथेनॉल चे गुणधर्म असतात. हे शरीराच्या जखमांना त्वरितच भरण्याचे काम करत. शिवाय केळीच्या फुलांचा सेवन योग्य पद्धतीने केल्यास बऱ्याच शारीरिक व्याधी दूर होतात. हे आपल्या त्वचेला नैसर्गिकरीत्या ओलावा देतं. 
 
अँटी एजिंग -
केळ्यात अँटी ऑक्सीडेन्ट मुबलक प्रमाणात आढळतात. हे चेहऱ्यावरील आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत मिळते. आपल्या क्रीम मध्ये केळीच्या फुलाचा समावेश करावा. एका भांड्यात केळ्याचे फुल वाटून क्रीम मध्ये समाविष्ट करून पेस्ट तयार करावी. ह्याला मॉइश्चरायझर मध्ये मिसळून त्वचेवर लावावे.
 
केसांचा कोंडा कमी करण्यासाठी - 
केळीचे आणि त्याचा फुलापासून तयार केलेल्या हेअर पॅकमुळे केसांचा कोंडा कमी होतो. त्यासाठी केळ्याचे फुल पाण्यामध्ये उकळवून घ्या नंतर पाणी गाळून घ्या. मिक्सरमध्ये केळ, केळफूल, दूध, मध मिसळा. आता ही पेस्ट केसांच्या मुळात लावा. काही वेळ ही पेस्ट तशीच राहू द्या. वाळल्यावर केस धुऊन घ्या. आठवड्यातून किमान दोन वेळा असे केल्यास कोंडा कमी होतो. पण हेअर पॅक लावण्यापूर्वी हातावर किंवा कोपऱ्यावर त्वचेवर पॅच टेस्ट करून बघा.
 
केसांच्या वाढीसाठी-
केळ्याच्या फुल आणि केळ मॅश करून पेस्ट तयार करा. केसांवर आणि टाळू वर हे लावावे या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट असल्यामुळे हे केसांना बळकट करतात. हा उपाय किमान आठवड्यातून दोन वेळा करावा.
 
* हे निव्वळ आपल्या माहिती साठी दिले आहेत, वापरण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोहाची कमतरता दूर करणारी काळ्या हरभऱ्याची चविष्ट चाट