Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dusky Skin Makeup सावळ्या रंगावर मेकअप करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अधिक आकर्षक दिसाल

Makeup
Webdunia
Dusky Skin Makeup भारतात सावळा रंग असणे अगदी सामान्य आहे. लोकांना उजळ रंगाप्रती आकर्षण असलं तरी सावळा किंवा गव्हाळ स्किन टोन खूपच आकर्षक असतो आणि मेकअप केल्यानंतर आणखी सुंदर दिसतो, परंतु यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मेकअप टिप्स आणि हॅक्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. 
 
वार्म टोन्ड कंसीलर - डस्की त्वचेच्या लोकांनी नेहमी वार्म टोन्ड कंसीलर वापरावे, जे तुमच्या त्वचेच्या रंगापेक्षा किंचित डार्क असावं. याच्या मदतीने त्वचेवर दिसणारे डाग, जखम आणि मुरुमांच्या खुणा सहज झाकल्या जाऊ शकतात.
 
वॉटर-बेस्ड फाउंडेशन- जर तुमचा रंग डार्क असेल तर वॉटर-बेस्ड फाउंडेशन तुमच्यासाठी सर्व प्रकारे उत्तम आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर ती आणखी तेलकट दिसू नये म्हणून वॉटर-बेस्ड फाउंडेशन सर्वोत्तम ठरेल.
 
वार्म कलर आयशॅडो- गव्हाळ रंगाच्या महिलांनी आयशॅडोमध्ये फक्त वार्म कलर निवडावेत, जसे की तपकिरी किंवा इतर न्यूड शेड्स. जर तुम्ही स्मोकी आय मेकअप करत असाल तर यामध्ये देखील फक्त गडद शेड्स वापरा.
 
डार्क शेड लिपस्टिक- सावळ्या रंगाच्या महिलांनी हलक्या शेडची लिपस्टिक टाळावी, कारण ती त्वचेच्या टोनवर खूप विचित्र दिसते. त्याऐवजी डार्क कलर्स तुमचे सौंदर्य वाढवेल. वाइन आणि ब्राऊन शेड्स खूप सुंदर दिसतात.
 
योग्य ब्लश- तुमचा रंग जर सावळा असेल तर तुमच्या चेहऱ्यावर ब्लशचं काय काम असा विचार करू नका, उलट त्यामुळे तुमचा लूक वाढेल, पण हो त्वचेपेक्षा पूर्णपणे वेगळा असणारा ब्लश निवडण्याऐवजी तो नैसर्गिक असावा याची काळजी घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Fresh Raita उन्हाळ्यात या ३ प्रकारचे रायते स्वाद वाढवतील

William Shakespeare Information महान नाटककार कवी विल्यम शेक्सपियर

Summer Special लिंबू पुदिना सरबत

Anniversary Wishes For Parents in Marathi आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

World English Language Day 2025:जागतिक इंग्रजी भाषा दिन का साजरा केला जातो जाणून घ्या

पुढील लेख
Show comments