Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Webdunia
रविवार, 3 जुलै 2022 (17:13 IST)
Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असते, त्यामुळे त्वचा आणि केसांच्या सर्व समस्या सुरू होतात. पावसाळ्यात जास्त केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणा यासारख्या समस्यांमुळे बहुतेक लोक त्रस्त असतात. सतत गळल्यामुळे केस निर्जीव आणि खूप पातळ होतात, ज्यामुळे आपली चिंता आणखी वाढू शकते. पावसाळ्यात केस अधिक तेलकट होतात आणि केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस खराब होतात. काही घरगुती उपाय अवलंबवून आपण केसांची चांगली काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 दही आणि लिंबू
पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही दही आणि लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात 1 लिंबाचा रस पिळून चांगले मिसळा. आता ते स्कॅल्पवर लावा आणि अर्धा तास राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पू आणि पाण्याने धुवा. असे केल्याने केसांना मॉइश्चर मिळते आणि केस गळणे कमी होते. एकत्र लावल्याने केस गळणे कमी होते. पावसात केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामुळे केसातील  कोरडेपणा दूर होतो. कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. दही आणि लिंबू एकत्र करून स्कॅल्प वर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या, नंतर केस धुवा.
 
2 केसांना गरम तेलाने मसाज करा
अनेक महिला पावसाळ्यात तेल लावत नाहीत त्यामुळे त्यांचे केस निर्जीव आणि कोरडे होतात आणि गळू लागतात. पावसाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. केस मजबूत करण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केसांना कोमट तेलाने मसाज करा. खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. केसांना गरम तेलाने मसाज केल्याने त्यांना योग्य पोषण मिळते आणि केस मजबूत आणि चमकदार होतात.
 
3 तेल आणि कापूर
पावसाळ्यात अनेकदा केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते, त्यामुळे केसांना खाज सुटणे आणि केस गळणे.सारख्या समस्या उदभवतात. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तेलात कापूर मिसळून लावा. यामुळे स्कॅल्प थंड होईल आणि कोंडा देखील दूर होईल.
 
4 एप्पल सायडर व्हिनेगरने केस धुवा
तुमचे केस खूप गळत असतील तर एप्पल सायडर व्हिनेगरने केस धुवा. यासाठी शॅम्पू करताना 2 चमचे एप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून केस धुवा. असे केल्याने स्कॅल्प वर (डोक्याच्या त्वचेवर) साचलेली धूळ आणि घाण निघून केस चमकदार होतात.
 
5 मुलतानी माती हेअर पॅक
जर तुमचे केस पावसाळ्यात निर्जीव आणि कोरडे झाले असतील तर केसांना मुलतानी मातीचा पॅक लावा. यासाठी मुलतानी मातीमध्ये पुदिन्याच्या पानांची पेस्ट आणि लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. यानंतर, केसांना शॉवर कॅपने झाकून ठेवा आणि काही काळ राहू द्या. यानंतर केस शॅम्पूने धुवा. असे केल्याने तुमच्या केसांची चमक परत येईल.  
 
6 एग मास्क 
पावसाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही एग मास्क देखील वापरू शकता. यासाठी एका अंड्यामध्ये दोन चमचे दही मिसळा आणि केसांना लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॅम्पू करा. यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल आणि केस बाऊन्सी आणि चमकदार होतील.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments