Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होळीचा रंग कसा काढाल?

Webdunia
' कलरफूल फेस्टिवल' म्हणजे होळी! रंग-तरंग आणि उमंग यांचे महान पर्व म्हणून आपण होळी मोठ्या हर्षोल्हासा‍त साजरी करत असतो. होळीचे सप्तरंग खेळायला प्रत्येकाला आवडतात. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ''बुरा न मानो होली है,'' म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स... 

* आजकाल केमिकलयुक्त रंग होळीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात. त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर लगेचच रंग धुवून टाकला पाहिजे. रंग जास्त वेळ त्वचेवर राहिल्यास त्याचे साईड इफेक्टस् होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.

* कपडे तसेच डोक्यावरी‍ल कोरडा रंग आधी चांगला झटकून घ्या. नंतर एका मुलायम कपड्याने आपल्या चेहर्‍यावरील तसेच त्वचेवरील रंग काढावा.

* रंग हलक्या हाताने काढावा अन्यथा जोरात रगडून काढल्याने त्वचेचे सालटे निघतात व त्वचा आग ही मारते.

* बेसन पीठात लींबूचा रस मिसळून रंग काढावा. खोबरेल तेल अथवा दही त्वचेवर लावून रंग हळूवार काढता येतो.

* रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जेंट अथवा कपडे धुण्याचा साबण उपयोगात आणू नका.

* केसांमध्ये असलेला कोरडा रंग आधी चांगल्या प्रकारे झटकून घ्या त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बेसन, दही अथवा आवळा पावडरने डोके धुतल्यास रंग लवकर निघतो. आवळा पावडर रात्रीच पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर केसांना शॉम्पू करावा.

* डोळ्यात रंग गेल्यास आधी पाण्‍याने ते स्वच्छ करावेत. डोळ्याची आग थांबत नसेल तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघड झाप करावी. थोड्या वेळानंतर डोळ्यांमध्ये गुलाब जल टाकावे. याशिवाय आय ड्रॉपचाही वापर आपण करू शकता.

* रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही फेशियल, मॅनिक्योर व पॅडीक्योर देखील करू शकतात.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments