आपला चेहरा निस्तेज झाला आहे. आपल्या चेहऱ्याला तजेल आणि सुंदर करण्यासाठी साय कामास येईल. चला तर मग आपण सायीचे फायदे जाणून घेऊया. साय आपल्या चेहऱ्याची त्वचेला मऊ आणि सतेज करण्याचे काम करते. साय मध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते जे आपल्या त्वचेतील टॅनिंग दूर करण्यास मदत करतं.
आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमितपणे साय वापरल्यावर लगेच आपल्याला परिणाम दिसून येतील. आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी या काही खास टिप्सचा वापर करू शकता.
चेहरा तजेल करण्यासाठी
सायीमध्ये काही थेंब लिंबाच्या रस आणि अर्धा चमचा मध घाला. आता ही पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी. 20 मिनिटे तसंच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि हातानेच हळुवारपणे कोरडं करा.
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण साय नियमितपणेने वापरू शकता त्यासाठी आपण सायीची पेस्ट बनवू शकता.
1 चमचा साय, 1 चमचा हरभरा डाळीचे पीठ, अर्धा चमचा मध. हे तिन्ही चांगले मिसळावे आणि चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. 10 मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.
टॅनिंग दूर करण्यासाठी
चेहऱ्याच्या टॅनिंगने वैतागला असाल तर या साठी साय खूप उपयुक्त ठरते.
1 चमचा सायीमध्ये टमाटे आणि लिंबाचा रस मिसळा. चांगल्या प्रकारे मिसळून टॅनिंग असलेल्या जागेवर लावा आणि चेहऱ्यावर कमीत कमी 20 मिनिटे तसंच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.