Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्किनी बेल्ट; एक फॅशन!

स्किनी बेल्ट; एक फॅशन!
, रविवार, 1 मार्च 2020 (14:44 IST)
आजकाल कमरेचा पट्टाही तुमच्या एकूणच पेहरावात 'अ‍ॅक्सेसरी' म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काही वर्षांपूर्वी लेदरचा मोठा बेल्ट जीन्स, स्कर्टस्‌वर लावून फॅशन केली जायची. पण, आज या मोठ्या बेल्टची जागा स्किनी (छोट्या/बारीक) बेल्ट्‌सनी घेतली आहे. रॅम्पवरही हा बेल्ट सध्या नवे ट्रेण्ड निर्माण करतो. फॅशन स्टेटमेंट फॉलो करणार्‍यांपैकी तुम्हीही एक असाल, तर स्किनी बेल्टचा सध्याचा ट्रेण्ड तुम्हाला माहीत असायलाच हवा. हे पट्टे वेगवेगळ्या तर्‍हेने वापरता येतात. गुडघ्यापर्यंतचा एकरंगी वनपीस किंवा लांब झगा घालायचा आणि त्या रंगाला कॉम्प्लिमेण्ट करणार्‍या वेगळ्या रंगाचा बेल्ट लावायचा. यामुळे एकूणच पेहराव आकर्षक दिसतो. स्लॅक्स आणि शॉर्ट कुर्तीवर थोडा ट्रॅडिशनल पट्टा लावल्यामुळे तुमच्या गळ्यातल्या कानातल्या अ‍ॅक्सेसरीइतकेच महत्त्च हा बेल्ट कॅरी करू शकतो.
 
एवढंच नाही, तर पट्‌ट्याचा नीट वापर केला तर तुम्ही बारीकही दिसू शकता. पँट किंवा स्कर्टवर थोडा लूज लाँग शर्ट आऊट ठेवायचा. वरून पट्टा कमरेला आवळायचा. त्यामुळे तुमची फिगर प्रमाणबद्ध दिसते. थोड्या जाड असणार्‍या मुली यामुळे दिसू शकतात, तर अगदी बारीक मुलीही या स्टाइलमुळे व्यवस्थित दिसतात. तसंच, या बेल्ट स्टाइलने सध्या जुन्या फॅशन सायकललाही पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आणलं. कमरेच्या खूप वर बेल्ट लावायचा. त्यामुळे ड्रेसला एक वेगळीच ग्रेस येते.
 
अगदी साधा पोशाख असेल, जुना असेल तरीही सिंगल बेल्ट कॅन मेक मिरॅकल्स! एका बेल्टमुळे तुमचा  संपूर्ण लूकच बदलून जाऊ शकतो. ज्याप्रमाणे इअररिंग्ज, नेकलेस, ब्रेसलेट ही अ‍ॅक्सेसरी आपण ड्रेसला मॅच करत असतो, त्याप्रमाणेच कमरेचा पट्टा, फुटवेअर, कॅप आणि बॅग एकमेकांना मॅच करून फॅशन स्टेटमेंट ठरवलं, तर नक्की ट्रेण्डी लूक येऊ शकतो. या स्टाइलला तुम्ही तुमचा टचही देऊ शकता. कधी पट्टा आणि सस्पेंडर्सचं कॉम्बिनेशन करायचं किंवा गळ्यातली मोठी माळ कधीतरी कमरेला पट्टा म्हणून गुंडाळायची तर कधी एखादा स्कार्फ कम मोठा रुमाल पट्टा म्हणून कमरेला गुंडाळायचा. काहीही केलं तरी छान फॅशन होऊ शकते आणि यातनंच तुमचंही वेगळेपण हायलाइट करता येऊ शकतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम