Marathi Biodata Maker

Hair Colour करण्याची योग्य पद्धत, या Steps वापरा

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)
सध्याच्या काळात केसांना रंग करण्याचे फॅशन जोरात सुरू आहे. स्टाईलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी केसांना कलर करणे एक स्टाइल स्टेटमेंटच बनले आहे. जे बहुतेक लोकांना आवडतं. पण केसांना कलर करणं हे नुकसानदायी देखील असू शकतं, कारण त्यातील रसायन आपल्या केसांना अत्यधिक कोरडे बनवू शकतं. तसेच केसांना रंग केल्यानं केस गळतात म्हणून केसांना कलर आपण नियमानं न करता कधीकाळीच करावं. हेच चांगलं असतं.
 
आपण घरातच केसांना कलर करत असाल तर काही गोष्टींना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या लेखात आम्ही आपल्याला केसांना कलर कसं करावं, या साठीच्या काही स्टेप्स सांगत आहोत. ज्या अवलंबून आपण घरच्या घरी केसांना कलर करू शकता. 
 
केसांना कलर करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
 
* कलर निवडल्यावर याला आपल्या त्वचेवर लावून याची चाचणी करावी या मुळे आपल्याला काही नुकसान तर होणार नाही, जसे की त्वचेच्या ऍलर्जीचा त्रास उद्भवणार नाही.
 
* केसांना कलर करण्यापूर्वी केसांना सौम्य शॅम्पूने धुऊन घ्या. ज्या दिवशी आपल्याला केसांना कलर करायचा आहे त्या दिवशी कंडिशनर वापरू नये, असे केल्यास केसांचे नैसर्गिक तेल नष्ट होतं.
 
* केसांना कलर करण्यापूर्वी आपल्या खांद्यावर टॉवेल ठेवा जेणे करून कलर आपल्या कपड्यांवर पडणार नाही.
 
* केसांना कंगव्याने विंचरून घ्यावं आणि गुंता सोडवून घ्यावा.
 
* कलर करण्यापूर्वी आपल्या त्वचेवर आणि मानेवर व्हॅसलीन किंवा क्रीम वापरा. याला चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर, मानेवर आणि खांद्यावर लावा जेणे करून आपली त्वचा कलर पासून वाचू शकेल. 
 
* कलर करण्यापूर्वी आपल्या हातात ग्लव्ज घाला जेणे करून आपले हात रंगणार नाही.
 
* केसांना लावायला कलर मिसळा.
 
* आता केसांना कलर करण्यासाठी केसांचे भाग करा आणि प्रत्येक भागात कलर करा.
 
* लक्षात ठेवा, की कोणतेही भाग सुटायला नको. केसांची विभागणी करण्यासाठी आपण क्लिप्स वापरू शकता.
 
* कलर कोरडे झाल्यावर केसांना धुऊन घ्या आणि हे लक्षात ठेवा की ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच प्रमाणे केसांमध्ये कलर तेवढ्याच वेळ ठेवा. जास्त काळ केसांमध्ये कलर ठेवल्यानं केस कोरडे होऊ शकतात, म्हणून याची काळजी घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

बेकिंग सोडा आणि इनोशिवायही मऊ इडल्या बनवता येतात; खरी जादू ही पीठ भिजवण्याच्या पद्धतीत आणि प्रमाणात असते

नैतिक कथा : खोटे बोलूनही, त्याला सत्य बोलण्याचे पुण्य मिळाले

उन्हाळ्याच्या दिवसात; चमचमीत जेवणासोबत लसूण-पुदिन्याचे थंडगार रायता नक्की ट्राय करा

Marathi Rajbhasha Din 2026 Wishes in Marahti मराठी राजभाषा दिन शुभेच्छा

ICSE, ISC निकाल जाहीर; या सोप्या पायऱ्या वापरून cisce.org वर तपासा

पुढील लेख
Show comments