Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरकुत्या दूर करण्यासाठी केवळ 4 स्टेप्स

सुरकुत्या दूर करण्यासाठी केवळ 4 स्टेप्स
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:03 IST)
सकाळी सर्वात आधी नॉन फोमिंग क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. दोन मिनिट मसाज करा आणि मग थंड पाण्याचे चेहरा धुऊन घ्या. स्वच्छ टॉवेलने टिपून घ्या. 
 
टोनर क्लिंजिंग दरम्यान उघडलेले छिद्र बंद करतं. टोनिंगमुळे त्वचा टाइट होते. आपण घरी देखील टोनर तयार करू शकता. यासाठी एक लीटर पाण्यात तुळस, कडुलिंब आणि पुदिन्याची पाने उकळून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत उकळी घ्या नंतर स्टोअर करून घ्या. 
 
त्वचा मॉइस्चराइज करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्किन टाइपसाठी हे आवश्यक आहे. याने त्वचा नरम होण्यास मदतं होते. याने त्वचेला नमी मिळते. ऑयली स्किनसाठी जेल फॉर्मूला वापरावं, सामान्य त्वचेसाठी वॉटर-बेस्ड, तसेच ड्राय स्किनसाठी रिच, क्रिमी मॉइस्चराइजर वापरावं.
 
उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे टॅनिंग होऊ लागते. बाहेर निघताना 30 एसपीएफ आढळणारे सनस्क्रीन वापरावे. याने यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून बचाव होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तंदुरूस्ती कायम राखताना