मॉइश्चरायझर हे त्वचे ला मऊ आणि कोमल बनवत.मॉइश्चराइझरचा वापर केल्यानं सर्व आवश्यक असलेल्या घटकांची पूर्णता होते.त्वचा चकचकीत राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या साठी चांगल्या प्रतीचे आणि गुणवत्तेचे मॉइश्चरायझर वापरावे. मॉइश्चरायझर वापरणे त्वचा चांगली ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. मॉइश्चरायझर कोणते वापरायचे या साठी काही टिप्स सांगत आहोत.
* जर आपली त्वचा तेलकट आहे, तर दररोज एकदा, आणि ते देखील रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावा.
* जर आपली त्वचा सामान्य किंवा कोरडी आहे, तर दिवसातून किमान दोन वेळा चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.सकाळी आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी.
* फेसवॉश प्रमाणेच मॉइश्चरायझरची निवड आपल्या त्वचेवर करा.
* त्वचा कोरडी असेल, तर असं मॉइश्चरायझर निवडा ज्यामध्ये सोया,बटर,कोकोबटर आणि ऑलिव्ह ऑइल असेल.
* तेलकट त्वचा असल्यास, वॉटरबेस्ड मॉइश्चरायझर विकत घ्या.तेलकट त्वचेसाठी हे प्रभावी असतात.