suvichar

Eyebrow wig craze क्रेझ आयब्रो विगची

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (09:53 IST)
Eyebrow wig craze भुवया चेहर्‍याला उठाव देण्याचं काम करतात. जाड, दाट आणि रेखीव भुवया असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करण्याचं कामही या कमानदार भुवयांद्वारे होतं. पण अनेकींच्या भुवया पहिल्यापासूनच विरळ असतता. अशा वेळी आय ब्रो पेन्सिलच्या सहाय्याने  भुवया दाट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण उठाव देण्यासाठी कृत्रीम भुवयांचा ट्रेंडही सध्या जोरात सुरू आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. अशा समारंभांमध्ये पायाच्या नखापासून केसांपर्यंत वेगवेगळ्या सजणार्‍या महिला भुवयांना तरी का सोडतील? म्हणूनच विरळ किंवा पातळ भुवया असणार्‍यांनी आता चिंता करण्याचं कारण नाही. 
कृत्रीम भुवयांमध्ये वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. 'आयब्रो विंग्ज' या नावाने ओळखल्या जाणार्‍या भुवया पारदर्शक स्टिक ऑन लेसवर खर्‍याखुर्‍या केसांचा वापर करून तयार केल्या जातात. कॅन्सरसारख्या आजारामधील उपचार पद्धतींमध्ये भुवयांचे केस निघून जातात. अशा रुग्णांसाठी आयब्रो विंग्ज वरदान ठरत आहेत. पण फक्त रुग्णच नव्हा तर सौंदर्यसाधनेच्या हेतूनेही याचा वापर दिसून येत आहे. आयब्रो विंग्ज या इतर आयब्रो प्रॉडक्टच्या तुलनेत वापरणं सोपं असल्याने महिला याकडे आकर्षित होत आहेत. आयब्रो विंग्जच्या किटमध्ये हव्या त्या आकाराचे आयब्रो विग, ग्लू, ग्लू रिमुव्हर आणि क्लिजिंग लोशन यांचा समावेश असतो. तेव्हा भुवया विरळ असल्याची काळजी करत बसण्यापेक्षा बाजारात जा आणि आयब्रो विंग्ज खरेदी करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

तुरटीच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे जाणून घ्या

Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering:इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या

वट सावित्री पूजेदरम्यान स्टायलिश दिसण्यासाठी लाल रंगाच्या साड्या नेसल्याने स्टायलिश लुक मिळेल

रात्रभर एसी मध्ये झोपण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे चक्रासन योग, इतर फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments