Marathi Biodata Maker

नाकाचं सौंदर्य खुलवण्यासाठी...

Webdunia
शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (17:52 IST)
जाड किंवा बेढब नाक हा अनेक महिलांसाठी अडचणीचा विषय असतो; पण बेढब नाक सुबक दिसू शकेल, असे काही उपाय मेकअपच्या माध्यमातून करता येतात. मेकअपच्या या पद्धतीमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलू शकतं.
 
काही स्त्रियांच्या नाकाचा आकार चेहर्‍याला साजेसा नसतो. काही स्त्रिया तर त्यांच्या नाकाच्या आकारामुळे इतक्या त्रस्त असतात की, त्या सरळ शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, तर काही स्त्रिया त्यांच्या नाकाच्या आकाराबाबत सतत तक्रारी करत असतात. बेढब नाक सुबक दिसावं, यासाठी शस्त्रक्रियेव्यतिरिक्तसुद्धा काही पर्याय आहेत. जाड नाक बारीक दिसावं, यासाठी सर्वांत आधी नोज पिन किंवा नथ बदला. आपल्या नाकावर कुठली नथ चांगली दिसेल, याबाबत एखाद्या ब्युटीशियनचा सल्ला घ्या. आपल्या नाकात जाड नथ चांगली दिसते की बारीक, हे एकदा निश्चित झालं, की बेढब नाकाची समस्या थोड्या प्रमाणात कमी होते.   
 
जाड नाक छोटं दिसावं, यासाठी कॉन्टुर मेकअपचा उपयोग होऊ शकतो. कॉन्टुर मेकअप ही एक कला आहे. एखाद्या ब्युटीशियनकडून तुम्ही एकदा कॉन्टुर मेकअप करायला शिकलात, तर घरीसुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. याध्ये मॅट ब्रॉन्जरचा वापर केला जातो. ब्रॉन्जरमुळे चेहरा कॉन्टुर होतो. तो उजळत नाही. यासाठी तुमच्याकडे ब्रॉन्झ मॅट असायला हवं; पण त्यासोबतच कॉन्टुर करणंही जमायला हवं. नाक छोटं दिवसां, यासाठी केसांच्या स्टाइलबाबत विचार करू शकता. हेअरस्टाइलच्या काही प्रकारांमुळे नाकाचा आकार लपवता येतो. यामध्ये एका बाजूला केलेले केस चांगले दिसतात. यासाठी उजव्या बाजूला शक्य तितक्या खाली भांग पाडून अधिकाधिक केस एका बाजूला ठेवा; पण अशा प्रकारचा हेअरकट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुरळे केस असलेल्या स्त्रियांच्या नाकाचा लूक बदलण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील, अशा हेअरस्टाइल्ससुद्धा करता येऊ शकतात.
 
नाक जास्ती चपटं असेल, तर नाकाच्या दोन्ही बाजूंना चटकन लक्ष जाईल, असं आकर्षक किंवा चमचमत्या रंगाचं ब्लशर किंवा फाउंडेशन लावा. नाकाच्या दोन्ही बाजूंच्या टोकांवर गडद फाउंडेशन आणि मधल्या भागात फिकं फाउंडेशन लावा. यानंतर नाकाच्या हाडाच्या आकाराचं हायलायटर लावा आणि एका गडद छटेचं कन्सिलर त्यात मिसळा. नाकाला योग्य आकार देण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात काळे कपडे घालणे नेहमीच चुकीचे असते का? 'हा' एक अपवाद तुम्हाला माहीत आहे का?

Rajma Recipe हॉटेलसारखा चवदार राजमा बनवण्याची सोपी रेसिपी

उष्माघात जीवघेणा ठरू शकतो! उष्माघाताचा त्रास झाल्यास या गोष्टी तातडीने करा

बारावीत कमी गुण मिळाले असतील, तर काळजी करू नका! हे १० पर्याय तुमचा मार्ग निवडायला मदत करतील

परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments