चेहरा ऑइली असेल तर घरगुती बनवलेल्या टोनरच्या सहाय्यानं सुस्थितीत राखता येतो. तेलकट त्वचेसाठी काकडीपासून बनवलेलं टोनर उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे टोमॅटोपासून बनवलेल्या टोनरच्या वापरानं चेहर्याचा वर्ण उजळतो आणि मुरुमांची समस्या कमी होते.
तुलसी टोनरही विशेष लाभकारक ठरतं. यासाठी तुळशीची पानं चुरडून उकळण्यता पाण्यामध्ये सोडावीत. थंड झाल्यावर या पाण्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळवा. आता तयार मिश्रण बाटलीत भरून टोनरसारखं वापरावं, याच पद्धतीनं मेथ्या घालून अथवा हळदीच्या सहाय्यानं टोनर बनता येतं. हळदीचं टोनर बनवताना एक