Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहांविषयी लोकांचा 'ग्रह'

Webdunia
WD
आपल्या देशात ज्योतिषाशिवाय अनेकांचे पान हलत नाही. लग्न असो वा नोकरी किंवा व्यापार सगळीकडे ज्योतिषाला प्राधान्य दिले जाते. या सगळ्यात महत्त्वाची ठरते ती तुमची कुंडली आणि तिच्यातील ग्रह. ग्रहांचा जीवनावर मोठा प्रभाव पडतो, अशी अनेकाची श्रद्धा असते. श्रद्धा अंधश्रद्धा या सदरात, आम्ही आपल्याला नक्षत्र व ग्रह यांच्या मुळे महत्त्व पावलेल्या एका दिवसाविषयी माहिती देणार आहोत.

16 नोव्हेंबर हा तो दिवस. या दिवशी सौरमंडळातील गुरू ग्रहावर होणार्‍या हालचालींना विशेष महत्त्व असते. या दिवशी मागील वर्षी वृश्चिक राशीत असलेला गुरू धनू राशीत प्रवेश करतो. या घटनेवेळी सकाळी 4:24 वाजल्यापासून हजारो भाविक गुरूच्या मंदिरात जाऊन पूजा करतात.

WD
तमिळनाडूत गुरूचे मंदिर असलेली अनेक ठिकाणे आहेत. परंतु, तंजावर जिल्ह्यातील आलनगुडी स्थानाचे विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराचे हे मंदिर गुरूच्या क्षे‍त्रातील एक आहे. गुरू पयार उत्सवाच्या दिवशी यथे लाखो भाविकांची गर्दी ओसंडते. इतर मंदिरातही भगवान गुरूच्या पूजा-अर्चनेची खास व्यवस्था केली जाते.

WDWD
आपल्या राशीत अनेक ग्रहांचा समावेश असतो. परंतु, गुरू आणि शनीच्या येण्याजाण्याला महत्त्व दिले जाते. यासंदर्भात ज्योतिष के. पी. विद्याधरन यांनी सांगितले, की सर्व ग्रहांमध्ये गुरूला शुभ ग्रहाची संज्ञा दिली जाते. प्रत्येक वर्षी गुरू एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. यावर्षी तो वृश्चिक राशीतून धनू राशीत गेला आहे. गुरू पयारच्या दिवशी लाखो भाविक अलनगुडी, थेनथिरूथिट्टई, थिरूचेंदूर येथील गुरूच्या मंदिरात जातात. जीवनातील सुखाचा काळ कायम राहू दे अशी प्रार्थना करतात. ज्यांच्या जीवनात वाईट चालले असेल ते त्यापासून लवकरात लवकर सुटका मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

वैदिक काळापासून ज्योतिषशास्‍त्र आपल्या परंपरेचा एक भाग आहे. आपल्या पूर्वजांना सौरमंडळ व आकाशगंगेचे चांगले ज्ञान होते. आजच्या वैज्ञानिक युगात आपण त्यांच्या ज्ञानालाच आधार मानून संशोधन करतो. एवढेच नाहीतर ग्रहांच्या नावावरून त्यांची लक्षणे ठरवली आहेत. यामुळेच ज्योतिषी या ग्रहांचा संबंध आपल्या जीवनाशी जोडतात.

WDWD
परंतु, हे मत काही प्रत्येकाला पटण्यासारखे नाही. काही जण तर याला अंधश्रद्धा असेही म्हणतात. व्यक्तीचे विचार आणि कर्तव्य त्याचे भविष्य ठरविते, असे त्यांचे मानणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जीवनात संकटे आली तर त्यांचा सामना करून पुढे जायला हवे.

WDWD
वैज्ञानिक दृष्टीकोनाचे समर्थक काहीही म्हणत असले तरी हजारो लाखो लोकांची मात्र ग्रहगोलांवर पूर्ण श्रद्धा आहे. आपल्याला अनुभव आला म्हणूनच आपण त्यावर विश्वास ठेवतो, असे त्यांचे म्हणणे असते. तुम्हाला काय वाटते? आपले आयुष्य खरोखरच दूर आकाशात असलेल्या ग्रहांवर अवलंबून असते? आम्हाला जरूर कळवा.

फोटो गॅलरीसाठी बघण्यासाठी येथे क्लिक करा......

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments