Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळया मशिदीचा 'सरदार'

Webdunia
WD
भूतबाधेने झपाटलेल्या व्यक्तीला मशिदीत नेल्याने त्याची भूतबाधा दूर होऊ शकते का? श्रध्‍दा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्‍ही याचाच शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी आम्ही गेलो मध्य प्रदेशातील देवासला. इथे दर गुरुवारी भुतबाधेने त्रस्‍त झालेल्‍या शेकडो लोकांची जत्राच भरते.

देवास शहराच्‍या स्मशानभूमीजवळ एका अज्ञात बाबाची कबर आहे. काली मशीद म्‍हणून ती या भागात प्रसिध्‍द आहे. दूरवरून भूतबाधित लोक येथे येतात आणि नवस करतात. काही वर्षांपूर्वी येथून नागधम्म नावाची नदी वाहत होती मात्र त्या नदीचे सद्या गंध्या नाल्यात रुपांतर झाले आहे.

WD
या ‍मशिदीचा इतिहास अज्ञात आहे. त्‍यामुळेच कुणी ती 1100 वर्ष जुनी असल्‍याचे सांगतात, तर कुणी 101 वर्ष जुनी. काहीही असो एक गोष्‍ट मात्र नक्‍की, की इथे दर गुरुवारी भुतबाधेने झपाटलेल्‍या हजारो लोकांची गर्दी होते. संपूर्ण परिसरात लोबानचा सुगंध पसरलेला असतो व भुतबाधेने पीडीत असलेल्या लोक वेड्या वाकड्या हलचाली करतात व मोठ-मोठ्याने वेगवेगळे आवाज काढीत असतात. असा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. एक वेळ असे वाटते की, आपण कुठल्या वेगळ्या प्रातांत आलो आहे.

मशिदीचा सेवक अर्जुनसिंहकडून याबाबत माहिती घेतली असता त्याने सांगितलं, की कोणतीही व्‍यक्‍ती येथे येऊन पाच गुरुवार बाबांची मनोभावे सेवा करील ती सर्व प्रकारच्‍या संकटातून मुक्त होईल. केवळ भूतप्रेतांपासून मुक्तीच नव्‍हे तर अनेकांच्‍या इच्‍छाही बाबांच्‍या कृपेने पूर्ण झाल्‍या आहेत. त्‍यांच्‍या आशीर्वादानं अनेक अंधांना दृष्‍टी मिळाली तर अनेकांना अपत्‍य प्राप्‍ती झाली आहे.

WD
या बाबतीत एक भाविक वामीक शेख यांनी सांगितलं, की माझ्या जीवनात जेव्‍हा-जेव्‍हा अडचणी आल्‍या तेव्हा तेव्हा मी बाबांना शरण आलो आणि मला सर्व काही मिळालं. अनेक गंभीर आजारांचे रुग्‍ण येथून बरे होउन गेल्‍याचे मी पाहिले आहेत.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणार्‍या विज्ञानाच्‍या युगात भूत-प्रेत ही एक भ्रामक कल्‍पना असल्‍याचे मानले जाते. त्‍याचवेळी इथं आलेले शेकडो लोक मात्र आपल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसलेले असतात.

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

Show comments