Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का नाही कापत मंगळवारी केस?

Webdunia
लहानपणापासून आम्हाला अशा काही गोष्टी सांगितल्या जातात ज्यांचे कारण न जाणून घेताच आम्ही अंधविश्वास ठेवून जगत राहतो. मजेदार बाब तर ही आहे की आम्हाला माहीत असून सुद्धा आम्ही अंधविश्वास पाळतो. तसेच आपण अश्याच काही गोष्टीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या:


मंगळवारी केस कापू नये
खूप आधी सोमवारी सुट्टी असायची त्यामुळे लोक त्या दिवशी केस कापून घेयचे. अशाने मंगळवारी त्यांना ग्राहक मिळत नव्हते. याकारणामुळे न्हावी हळू हळू मंगळवारी सैलून बंद ठेवायला लागले. ही परंपरा आजही चालू आहे जेव्हा की आता रविवारी सुट्टी असते. पण कारण न जाणता आजही लोक मंगळवारी केस कापणे टाळतात. 

घरात छत्री उघडू नये
छत्री उघडण्यासाठी जास्त जागेची गरज असते आणि घरात छत्री उघडली तर घरातील सामान तुटण्याची शक्यता असते. म्हणून अशी परंपरा पडली असावी.


लिंबू-मिरच्या बांधणे
लिंबू टोटका तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आपण बघितलं असेल की कित्येक लोक आपल्या वाहन आणि दुकानाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका दोर्‍यात लिंबू- मिरच्या ओवून लटकवतात. पण एका शोधाप्रमाणे लिंबू आणि मिरच्या ओवल्यानंतर एक तीक्ष्ण गंध येत असतो ज्याने डास आणि इतर कीट दूर पळतात.


काच फुटणे अपशकुन
काचेचं सामान नाजुक असतं. जरा हातातून सटकलं की तडकतं. हे फुटल्याने काचेचे तुटके चारीबाजूला पसरतात आणि पायात टोचण्याची भीती असते. या सर्वांपासून वाचण्याकरिता ही भीती मनात घातली असावी की काच फुटल्याने अपशकुन होते ज्याने लोक काचेचं सामान सांभाळून वापरतील.


सूर्यास्तानंतर नखं कापू नये
आधी वीज नव्हती त्यामुळे सूर्यास्तानंतर अंधारात नखं कापल्याने जखम व्हायची भीती असायची.


संध्याकाळनंतर केर काढल्याने लक्ष्मी रुसते
आधी वीज नसल्यामुळे ही प्रथा पडली असावी. चुकीने एखादा दागिना घरात पडला आणि अंधारात केर काढताना फेकण्यात आला तर लक्ष्मी घरातून निघाली असंच म्हटलं जाईल न! म्हणूनच तेव्हा रात्री केर न काढण्याची परंपरा सुरू झाली असावी आणि आज इतके दिवे असतानाही हा अंधविश्वास पाळला जात आहे.

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

श्री रेणुका सहस्त्रनाम स्तोत्र

श्री शाकंभरी देवीची आरती

शाकंभरी नवरात्र 2025 मध्ये कधी सुरू होईल, काय आहे त्याचे महत्त्व?

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments