Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चमत्कारी(क) सत्यसाईबाबा

Webdunia
WDND
सत्यसाईबाबा हे आध्यात्मिक जगतातील एक मोठं नाव असून तितकंच वादग्रस्तही आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मालिकेत आम्ही सत्यसाईबाबांचे काही कथित चमत्कार तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहोत. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील प्रशांति निलयममध्ये निवास करणार्‍या सत्यसाईबाबांची लोकप्रियता फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे.

बाबा जे काही करतात तो चमत्कार असतो, असे त्यांच्या शिष्यांचे आणि भाविकांचं ठाम मत आहे. बाबा भक्ताचं दुःख स्वतःवर ओढवून घेतात आणि भक्ताला संकटातून मुक्त करतात, असाही त्यांचा विश्वास आहे. बाबा रोज काही ना काही चमत्कार घडवून आपल्या सामर्थ्याची कल्पना भक्तांना देत असतात. कधी ते हातातून विभूती काढतात, तर कधी अन्न तर कधी एखादी छोटी वस्तू, कधी कधी तर अंगठी, हार, घड्याळ असे काहीही ते काढून दाखवितात.

WDWD
एवढंच नाही तर त्यांच्याकडे चमत्कारांची मालिकाच आहे. कधी कधी ते चक्क हवेतही उडतात. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी आपोआप जातात. जागच्या जागी गायबही होतात. संगमरवराची साखर करतात. पाण्याचे रूपांतर दुसर्‍या कुठल्या तरी द्रवात करतात. आपल्या कफनीचा रंगही ते बदलून टाकतात. कुठल्याही झाडाला कुठलेही फळ आणून दाखवू शकतात. ते चक्क हवामानावरही नियंत्रण मिळवून हवे तसे हवामान निर्माण करतात. असले काहीही चमत्कार ते करतात.

सत्यसाईबाबांच्या सांगण्यानुसार या वस्तू अध्यात्मिक प्रेरणेतून निर्माण होतात. मात्र, परीक्षा म्हणून चमत्कार करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

WDWD
भारतातील काही नियतकालिकांनी बाबांच्या या चमत्कारावर भरपूर लिहिलं आहे. हे चमत्कार म्हणजे थोतांड असल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यात काही जादूगारांची मतही घेतली आहेत. त्यातील काहींनी तर बाबा फसवणूक करतात असंही म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर काहींनी चक्क सुवर्ण नियंत्रण कायद्याचा भंग केला म्हणून बाबांना कोर्टात खेचलंय. कारण काय तर ते हातातून सोन्याच्या वस्तू काढून दाखवतात म्हणून. अर्थात, पुढे ही याचिका फेटाळली गेली.

काही जादूगारांनी सत्यसाईबाबा करतात, तेच कथित चमत्कार स्वतःही करून दाखविले आहेत. त्यात काहीही चमत्कार नाही हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. हातातून शिवलिंग काढून दाखविण्याचा चमत्कारही यापैकीच एक आहे. पण बाबांचे भक्त याला चमत्कारच मानतात.

WDWD
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तर बाबांनी वेगळाच प्रकार केला. त्या दिवशी आपण चंद्रावर जाणार आहोत, आपल्याला बघायला विमानतळावर या असे त्यांनी भक्तांना सांगितलं. मग काय विमानतळावर ही गर्दी जमली. पण त्या दिवशी ढग असल्याने चंद्रच दिसला नाही. त्यामुळे बाबांना चंद्रावर काही जाता आलं नाही. पण त्यामुळे जी गर्दी विमानतळावर झाली ती आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. समाजातील शिक्षितांना मात्र हे बाबांचे प्रसिद्धी मिळविण्याचे फंडे आहेत, असे वाटते.

याच्या उत्तरादाखल बाबांनी फक्त इतकेच सांगितले की, मी देव आहे आणि तुम्हीही देव आहात. आपल्या दोघांत फरक फक्त एकच आहे, मला माझ्या देवत्वाची जाणीव आहे, आणि तुम्हाला ती नाही.

या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटत? हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.......

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments