Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील 30 विचित्र अंधश्रद्धा...

Webdunia
शिंक येणे किंवा मांजरीने रस्ता कापणे सारख्या अनेक अंधश्रद्धा आपल्या माहीत असतील पण भारतासह परदेशातदेखील अशी काही अंधश्रद्धा पसरलेली आहे की जे जाणून आपल्या आश्चर्य तर वाटेल पण हसूदेखील येईल. पाहू अश्या काही अंधश्रद्धा...
1. इजिप्त येथे नुसती कात्री चालवणे वाईट समजले जातात. येथे कात्रीचे तोंड खुले ठेवण्याने दुर्दैव आडवं येतं असे म्हणतात.
 
2. इजिप्त येथे घुबड पाहणे किंवा त्याची आवाज ऐकणे दुर्दैव मानले जाते.
 
3. चीन येथे चार अंक वाईट मानलो जातो. चिनी भाषेत याचे उच्चारण करणे मृत्यूसमान असते.
 
4. फ्रान्समध्ये जर आपला डावा पाय कुत्र्याच्या शीटवर पडला तर याला शुभ समजलं जातं, पण आपला उजवा पाय त्यावर पडला तर दुर्दैव आहे असे मानले जाते.
 
5. लिथुआनिया येथे मानले घरात बसून शिट्या वाजवणे म्हणजे घरात सैतानांना आमंत्रित करणे.

6. जपानमध्ये दफनभूमीच्या जवळून जाताना लोकं आपला अंगठा आपल्या बोटांमध्ये लपवतात ज्याने त्यांच्या पालकांची अकाळी मृत्यू टळते.
 
7. जपानमध्ये तांदुळाच्या वाटीत चॉपस्टिक्स सरळ ठेवणे वाईट मानले जाते.
 
8. तुर्की येथे रात्री च्युइंग गम खाणे निषिद्ध आहे. येथे असे मानले जाते की रात्रीच्या अंधारात ही च्युइंग गम एखाद्या मृत मनुष्याच्या मासात परिवर्तित होते.

9. रशियात आपल्या संपत्ती, कार किंवा स्वत:वर चिमणीची बीट पडणे समृद्धीचे लक्षण मानले जाते.
 
 
10. रशियात पिवळे फूल देणे संबंध तोडण्याचे प्रतीक आहे, हे विश्वासघात दर्शवतं.

11. स्पेन येथे नवीन वर्षारंभी 12 वाजता 12 अंगूर खाण्याने 12 महिने सुख- समृद्धी नांदते असे मानले जाते.
12. स्पेनमध्ये कुठेही डाव्या पायाने प्रवेश करणे चुकीचे मानले जाते.
 
13. स्पेन मध्ये 13 तारखेला मंगळवार आल्यास शुभ मानले जाते.
 
14. रवांडा येथे स्त्रियांनी शेळीचे मटण खाल्ल्यास त्यांना दाढी मिशा येतील असे म्हणतात.
 
15. जर्मनीत पाण्याच्या ग्लासाने चीयर्स करणे चुकीचे मानले जाते. याचा अर्थ आपण पाणी पिणार्‍याची मृत्यू इच्छितो असे मानले जाते.

16. ब्राझील येथे मानले जाते की आपला पर्स जमिनीवर पडल्यास आपल्याला दारिद्र्य भोगावं लागतं.
 
 


17. अमेरिका येथे असे मानले जाते की रस्‍यात्यावरील एखाद्या फुटलेल्या रेगेवर पाय ठेवल्यास आपल्या आईला कंबर दुखीचा त्रास उद्भवू शकतो.
  
18. स्वीडन येथे मानले जाते की जर आपण अश्या मॅनहोलवर पाय ठेवला ज्यावर के अक्षर लिहिलेलं असेल तर आपण प्रेमात यशस्वी ठराल. परंतु ए अक्षर असलेल्या मॅनहोलवर पाय ठेवल्याने प्रेमात निराशा हाती येईल.
 
19. पोर्तुगाल येथे मागल्या बाजूला चालत असाल तर हे सैतानाला रस्ता दाखवण्यासारखे आहे.
 
20. नायजेरिया येथे लहान मुलांच्या ओठांवर किस करणे दुर्दैव मानले जाते.

21. नेदरलँड्स येथे शेजारच्यांना मीठ देणे दुर्दैव मानले जाते.
 
22. नेदरलँड्स येथे डायनिंग टेबलावर गाणं गाणे म्हणजे सैतानाला गाणं ऐकवण्यासारखे असल्याचे मानले जाते.
 
23. भारतात मंगळवारी केस कापवणे अशुभ मानले आहे.
24. भारतात सूर्य ग्रहणावेळी प्रत्येकाने घरात असले पाहिजे कारण तेव्हा विषारी व हानिकारक किरणांपासून वाचणे आवश्यक आहे असे म्हणतात.
 
25. सर्बिया येथे एखाद्याच्या मागे पाणी सांडून पसरणे वाईट मानले जाते.

26. कोरियात झोपताना पंखा चालवण्याने श्वास घुटमळून आपली मृत्यू होऊ शकते असे मानले जाते. 
 
27. युके येथे नीलकंठ बघणे अशुभ आहे, आणि अनेक लोक आपल्याला सॅल्यूट करता किंवा आपण टचवुड पाहिल्यावर अशुभ परिणाम नाहीसा होतो.
 
28. युके येथे अनेक लोकं नवीन जोडे टेबलावर ठेवणे अशुभ मानतात.
 
29. युके येथे काळ्या मांजरीने रस्ता कापणे भयंकर संकेत मानले जाते.
 
 
30. सेनेगल येथे लोकं आपल्या यात्रांबद्दल इतर लोकांशी चर्चा करणे टाळतात कारण समोरच्याची दृष्टी सैतानी असू शकते असे ते मानतात.

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments