Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाबुआतील आदिवासींचा गाय गौरी उत्सव

श्रुति अग्रवाल
ShrutiWD
भारतात विभिन्न प्रथा-परंपरा व रूढीं आढळून येतात. मात्र, श्रद्धेतून सुरूवात होणार्‍या विविध रूढी-परंपरांचा शेवट अंधश्रद्धेत होत असल्याचे आढळते. श्रद्ध ा- अंधश्रद्धेच्या आजच्या सदरातून आम्ही वाचकांना मध्यप्रदेशातील झाबुआ या आदिवासी बहुल भागातील गाय गौरी (गोवधर्न पूजा) नावांने प्र‍चलित प्रथेची ओळख करून देणार आहोत.

भारतीय संस्कृतीत गायीस मातेचा दर्जा प्राप्त आहे. गाय आजही आदिवासी कुटुंबीयांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. गौमातेचे ऋण फेडण्यासाठी हे लोक गोवर्धन उत्सव साजरा करतात. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी पाडव्यास (गोवर्धन पाडवा) साजरा करण्यात येतो. याप्रसंगी आदिवासी बांधव सकाळीच आपल्या गाय- बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर रंगाचे शिक्के मारून सजवतात.

नंतर गावातील गोवर्धन मंदिरात पूजा केली जाते. पूजेनंतर गावकरी मंदिरास पांच परिक्रमा घालतात. यावेळी गायी अग्रभागी असतात. स्त्रिया व वयोवृद्ध नागरीक ढोल-ताशांच्या गजरात अष्ट कवींच्या कवितेतील ओळींचे गायन करतात. हे दृश्य पाहण्यास अतिशय सुंदर वाटते. मात्र, त्याचक्षणी गाय गौरी उत्सवाचे दुसरे रूप पाहून अंगावर शहारे येतात.

गौमातेला प्रसन्न करण्यासाठी आदिवास ी
ShrutiWD
गायींच्या पायाखाली झोकून देऊन स्वत:स तुडवून घेतात. विश्वास बसणार नाही, झाबुआत गाय गौरी उत्सव असाच साजरा करण्यात येतो. गौमातेचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी परिक्रमेवेळी आदिवासी गायींच्या लोंढ्यांपुढे लोटांगण घेतात आणि जनावरांचा लोंढा त्यांच्या अंगावरून जातो. आदिवासी आपले कुटूंब सुखी व आनंदी राहण्यासाठी गाय गौरीला वरदान मागतात. यासाठी ही भयंकर रूढी पाळतात. व्रताच्या पूर्ततेअगोदर ते दिवसभर उपवास पाळतात.


ShrutiWD
त्यानंतर मंदिराची परिक्रमा करतांना गायींच्या टाचांखाली तुडवून घेतात. व्रताच्या पूर्ततेसाठी आमच्यासमोरच कितीतरी आदिवासींनी गायींच्या खुरांखाली तुडवून घेतले. आणि पाहता पाहता कितीतरी गाय बैल त्यांना तुडवत पुढे निघून गेले. या अदभूत प्रथेविषयी अधिक माहिती घेतली असता, गाय मातेला माफी व वरदान दोन्हीही मागत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरीक भूरा यांनी दिली.

कित्येक वर्षापासून ते व्रताचे पालन करत असून यामुळे त्यांना अनेकदा जखमाही झाल्या आहेत. व्रताच्या पूर्ततेसाठी लोक उपाशी राहतात, मात्र दारू पिणे सोडत नाही. नशेत असल्या व्रताची पूर्तता करताना कित्येकदा दुर्घटनाही होतात.

दोन हजार एक सालापर्यंत गायीच्या शेपटीस फटाके बांधण्यात येत होते. परिणामी गायी सैरावैरा पळाल्याने मोठे अपघात होत असत. स्थानीक प्रशासनाचे त्याची गंभीर दखल घेवून फटाके बांधण्यासारख्या गोष्टींवर बंधने घातली. महोत्सवादरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात करून उपद्रवी घटनांवर प्रतिबंध घालण्यात येतो.

याविषयी गोवर्धन मंदिराचे पुजारी दिली प
ShrutiWD
कुमार आचार्य यांना विचारले असता, गाय गौरीचे व्रत पूर्ण पाडणार्‍यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे सांगितले. यामागे आईच्या पाया पडतो त्याचप्रमाणे वर्षातून एकदा गौमातेचा आर्शिवाद घेण्याची भावना आहे. गावकरी व पुजारी छातीठोपकणे काहीही होत नसल्याचे सांगत असले तरी उत्सवादरम्यान गायींच्या खुरांखाली तूडवून घेणारे बहुतांश नागरीक जखमी झाल्याचे आम्ही पाहिले. कित्येकांची डोकी फुटली होती. मात्र, जखमानंतरही त्यांच्या उत्साहास लगाम बसला नाही. ही प्रथा श्रद्धेचा भाग आहे की अंधश्रद्धेचा? आपणांस काय वाटते?

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments