Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रहस्यमय मेसॉनिक लॉज

श्रुति अग्रवाल
WDWD
श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या भागात स्कॅरी हाऊसचे गूढ उकलण्याचा प्रतत्न करणार आहोत. इंदूर येथून सुमारे तीस किलोमीटरवर असलेल्या महू येथे हे स्कॅरी हाऊस आहे. येथून रात्री चित्रविचित्र आवाज येतात, असे सांगितले जाते. येथील स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर येथील रहस्याचा उलगडा होण्यास मदत झाली.

सॉलोमन राजाच्या कारकिर्दीत या लॉजची स्थापना झाली. सध्या बहुतांश बुद्धिजीवी लोक या सोसायटीचे सदस्य आहेत. सदस्यांच्या रहस्यमय कार्यपद्धतीमुळे या सोसायटीस रहस्याचे वलय लाभले आहे. काहींच्या मते येथे तंत्रपूजा करण्यात येते, तर काहींच्या मते पारलौकिक रहस्याचे संशोधन करण्यात येते. मेसॉनिक पंथाचे लोक काळ्या सैतानाची आराधना करतात, असेही सांगितले जाते. मात्र खरी माहिती कुणाकडेच नाही.

रहस्याचा पडदा उलगडण्याची सुरूवा त
WDWD
प्राध्यापक जॅडी हॉलीवर यांच्यापासून झाली. सुमारे बावीस वर्षापासून ते मेसॅनिक संघटनेशी संबंधित आहेत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पानंतर या संस्थेबाबतच्या तत्वज्ञानाबाबतची माहिती कळाली. वस्तुतः मेसॉनिक गोपनीयतेचा भंग कधीही करत नाही. पण बर्‍याच विनंतीनंतर हॉलीवर व त्यांच्या सहकार्‍यांनी काही बाबी उघड करण्याची तयारी दर्शवली.

मेसन्सनी आम्हाला त्यांच्या मंदिरात बोलवले. नियोजित वेळेत आम्ही तेथे पोहचलो. वर्दळीपासून हे मंदिर दूर आहे. त्यालाच मेसॉनिक लॉज असे म्हणतात. अंधारात तर हा लॉज भयानक वाटतो. काही वेळानंतर मेसन हॉलवर राधा मोहन मालवीय, मेसन मेजर बी. एल. यादव, मेसन किशोर गुप्ताही येथे पोहचले. लॉजच्या आवारात प्रवेश केल्यानंतर आम्हास डोळ्याचे चित्र आढळले. मेसॉनिक या चित्राची आराधना करतात, असे म्हटले जाते. येथे काही दुर्मिळ चित्रेही होती. यामध्ये जुन्या सदस्यांची चित्रे होती.

WDWD
यानंतर मेसॉनिक टेंपलकडे आम्ही मोर्चा वळवला. सॉलोमन राजाने या मंदिराची पायाभरणी केल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या भिंतीवर सॉलोमन राजाचे तत्वज्ञान सांगणारी चित्रे होती. एका बुजूर्ग मेसॉनिकने असामान्य वैशिष्ट्य असणारी व्यक्ती मेसॉनिक होण्यास पात्र असल्याचे सांगितले. थोडक्यात याचे सदस्यत्व खुले नाही. सोसायटीच्या नवीन सदस्यांना 'डेकॉन' नावाने संबोधण्यात येते. अनुभवानंतर तो वरिष्ठ डेकॉन बनतो. यानंतर वरिष्ठ व कनिष्ठ वार्डन पदापर्यंत बढती मिळते. यानंतरच तो 'मेसॉन' बनण्यासाठी पात्र ठरतो. येथपर्यंत पोहचल्यानंतर तो खराखुरा मेसान आहे, यावर शिक्कामोर्तब होते. त्यास 'व्हर्च्युअल मास्टर' म्हणून संबोधण्यात येते. तो संपूर्ण ग्रुपचे नेतृत्व करतो.


WDWD
मेसॉन बनण्यासाठी प्रत्यकास तीन पदव्या पूर्ण कराव्या लागतात. पहिल्या पायरीत व्यक्तीस तो मजूर असून त्यास सौंदर्य निर्माण करण्यासाठी सांगण्यात येते. उदा. मानवतेची सेवा. दुसर्‍या टप्प्यात आपले उत्कृष्ट कार्य जीवनाचे रूपांतर सुंदर मंदिरात करते, असे सांगण्यात येते. तिसर्‍या टप्प्यात मेसॉनिकला जीवन नश्वर असल्याचे धडे देण्यात येतात. यामध्ये शवपेटीसोबत मातीत पुरल्यानंतर मानवी सांगाड्यातून शेवटचे कोणते हाड शिल्लक राहते, याविषयी सांगण्यात येते.

मेसॉनिक सोसायटीच्या या कार्यपद्धतीमुळे लोकांना त्यांचे कार्य गूढ वाटते. आठवड्यातून एकदा मध्यरात्री ते एकत्र जमतात. प्रकाशात ते बैठक घेत नाहीत. ते काळोखातच काम करतात. त्यांची कार्यपद्धती इतरांपासून अलिप्त असल्याने, कुणासमोरही त्याचे प्रदर्शन करत नसल्याने मेसॉनिक दैत्यांशी खेळतात, अशी काहींची समजूत आहे. पण त्यात काहीही सत्यांश नाही.

मेसॉन मंदिर पायथागोरसच्या प्रमेयाव र
WDWD
आधारीत असल्याने येथे बुद्धिबळ बोर्ड व तलवार ठेवण्यात आली आहे. यामुळे मेसॉन विविध रेखा‍कृती बनवतात, नि‍रनिराळे कपडे व दागिने घालतात. यासोबतच त्यांची बसण्याची पद्धतही एकदम हटके आहे. त्यांची चर्चा शास्त्रशुद्ध पद्धतीने होते, मात्र सामान्य माणसास याचा बोध होणे कठीण आहे. सॉलोमन राजाच्या काळात येथे मृत्युदंडासारख्या शिक्षाही देण्यात आल्या आहेत. यामुळे येथे लोकांच्या रडण्याचे आवाज येत असतात व त्यामुळे लोकांमध्ये मेसॉनिक काळी जादू करत असल्याचा गैरसमज पसरला आहे.

मेसॉन बंधुत्वावर विश्वास ठेवतात. प्रत्येक मेसॉनने सोसायटीच्या सदस्यास मदत करणे यात अभिप्रेत आहे. निर्मितीसंबंधी विविध अवजारे त्यांच्याकडे असतात. चिन्ह, संकेत, अवजारांमुळे त्यांच्या सोसायटीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

WDWD
या अवजारांबाबत त्यांना विचारले असता, प्राचीन काळात घरे बांधण्यासाठी मेसॉन्सने याचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जगभरात सुमारे 240 मेसॉनिक लॉजेस आहेत. स्कॉटलंड येथे त्यांचे मुख्यालय असून ते एकमेकांशी जोडलेले असून त्यांच्या नियम व कायद्यांचे पालन करतात. प्रत्येक लॉजला क्रमांक असते. महू येथील लॉजला क्रमांक आहे - 389 ( sc). मेसॉनिक सोसायटीबाबतच्या रहस्याचा भेद येथे करण्यात आला आहे, मात्र, अजूनही बर्‍याच गोष्टी रहस्याआड दडल्या आहेत. या सोसायटीबाबत आपणास काय वाटते?



Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

Show comments