Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सळईने डाग देण्याची उपचार पद्धत

श्रुति अग्रवाल
ShrutiWD
श्रद्धा-अंधश्रद्धा या विशेष मालिकेत आम्ही आजपर्यंत समाजातील प्रस्थापित अंधश्रद्धांपासून आम्ही तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. यातील काही भाग विविध मार्गांनी उपचार करणाऱ्या भोंदूबाबांवर आधारीत होते. व्याधीने त्रस्त व्यक्ती सर्व उपाय हरल्यावर नकळतपणे भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकते. आम्ही आमच्या वाचकांना या बाबांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो. अंधश्रद्धेबाबत समाजजागृती करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आजच्या भागात आम्ही आपणांस मध्यप्रदेशातील 'देहात' या गावी घेऊन जाणार आहोत. या गावात चाचवा नावाच्या उपचार पद्धतीत रोग्याच्या शरीरास गरम सळईने डाग दिले जातात.

मध्यप्रदेशातल्या विदिशा, खंडवा, बैतूल, धार, ग्वाल्हेर, भिंड-मुरैना या भागात ही पद्धती प्रचलित आहे. या पद्धतीने उपचार करणार्‍या व्यक्तीस बाबा नावाने संबोधण्यात येते. यानुसार रूग्णाच्या अंगावर जेथे गरज आहे, तेथे चिन्हांकित करण्यात येते. त्यानंतर तेथे गरम सळईने डाग देण्यात येतात. यामुळे रोगी व्याधीमुक्त होतो असा बाबाचा दावा आहे.

यासंदर्भात आम्ही पिपलिया गावातील चाचवा
ShrutiWD
बाबा अंबाराम यांच्याशी संपर्क साधला. वीस वर्षापासून ते या पद्धतीने उपचार करतात. त्यांच्या वडिलांपासून ही परंपरा सुरू आहे. पोटदुखी, गॅस, क्षय, मानसरोगापासून अगदी आतड्याच्या व्याधीपर्यंत चाचवा पद्धतीने उपचार केले जातात. चाचवा (लोखंडी सळई) लावल्याने व्यक्तीच्या शरीरातील व्याधी जळून जात असल्याचे अंबाराम सांगतात. त्याच्याकडून एकापेक्षा अधिक वेळा डाग घेणारेही अनेक जण आहेत.

त्यांच्यापैकीच एक चंदरसिंह. त्यांनी आम्हाला पोट़ डोके व छातीवरील चाचव्याच्या खुणा दाखवल्या. चाचवा लावताच आपणांस आराम मिळत असल्याचे चंदरसिंह सांगतो.

ShrutiWD
पोट, डोके व आतड्याच्या व्याधीसाठी त्याने डाग घेतले आहेत. गोंदण केल्याप्रमाणे चाचव्याच्या खुणाही आयुष्यभर शरीरावर रहातात. अंबाराम रूग्णाचा गळा, डोके, पोटापासून कोणत्याही पिडीत भागास चाचवा लावतात. अंबारामकडे आलेल्या बहुतेक रूग्णांच्या शरीरावर डाग होते. याचा अर्थ यावरून अंबारामकडे लोक यासाठी वारंवार येत होते.

WDWD
आठवड्याच्या प्रत्येक रविवारी त्यांच्या दारावर उपचारासाठी आलेल्या लोकांची गर्दी जमते. आबालवृद्धांपासून सर्वांनाच येथे चाचवा लावतात. व्याधीग्रस्त भागावार चाचवा लावल्यास चटका बसत नसल्याचा अंबादास यांचा दावा आहे. पण डाग दिल्यानंतर वयोवृद्ध व लहान मुलांना असह्य वेदनेने विव्हळतांना पाहिल्यावर यात काहीच तथ्य नाही, हे लक्षात येते.

मात्र, बाबावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या नजरेस ही बाब येत नव्हती. चाचवा लावल्यानंतर आपण बरे होऊ एवढेस त्यांना माहित होते. म्हणूनच राधिका नावाच्या लहान मुलाला डाग देऊ नये यासाठी तिच्या आईची पुष्कळ मनधरणी आम्ही केली.

पण ती निष्फळ ठरली. '' बाळांस अतिसार होत आहे. डाग दिला नाही तर त्याचे प्राण जातील’’ असे उत्तर राधिकाच्या आईने दिले. या अनुभवाने व्यथित झाल्यानंतर आम्ही या उपचारपद्धतीबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांच्या मते या उपचारातून रूग्ण अजिबात बरा होत नाही. केवळ मानसिकदृष्ट्या त्याला आपला रोग बरा झाल्याचा भास होतो. शिवाय यामुळे संसर्गाची शक्यता वाढून गॅंगरीन होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

बालरोग तज्ञ डॉ. अशोक सोनी यांनी यासंबंधीत एक सत्यघटना सांगितली. ते म्हणाले, की 'आपल्या चार महिन्याच्या बाळास घेऊन डॉक्टरांकडे एक दांपत्य आले.

बाळाच्या नाभीजवळ झालेली जखम पूर्णपणे पिकल ी
ShrutiWD
होती. बाळाची नाळ न सुकल्याने बाबांपासून चाचवा लावून घेतला, मात्र, आता त्याठिकाणी जखम झाली होती. त्यानंतर जवळपास महिनाभर बाळाची दररोज मलमपट्टी केली. तेव्हा कुठे ती जखम बरी झाली. आईवडीलांनी आणखी थोडे दुर्लक्ष केले असते तर बाळाच्या जीवावर बेतले असते'.या अधंश्रद्धेमुळे लोक बाबा, बुवा व वैदूंच्या जाळ्यात अडकतात व पैशासोबतच आरोग्यही घालवून बसतात, याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण.

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments