Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कावळा आणि घुबडाची आवाज, जाणून घ्या काय संकेत देतात

कावळा आणि घुबडाची आवाज, जाणून घ्या काय संकेत देतात
कावळा असो वा घुबड, या दोघांची आवाज अशुभ समजली जाते परंतू दरवेळेस हे समजणे योग्य नाही. या दोघांची आवाज काय संकेत देते हे जाणून घेण्याची गरज आहे. तसेच हे संकेत केवळ परंपरा आणि मान्यतेवर आधारित आहे. विश्वास न करणारे याला अंधविश्वासाच्या श्रेणीतही ठेवू शकतात.
 
कावळ्याची आवाज:
*प्रथम प्रहरात कावळ्याची आवाज ऐकल्यास अतिथी येऊ शकतात.
*दूसर्‍या प्रहरी ऐकल्यास व्यापारा लाभ होण्याची शक्यता असते.
*प्रथम प्रहरी दक्षिण दिशेकडे कावळ्याची आवाज ऐकू येत असल्यास आर्थिक लाभ होतं.
*दुपारी ऐकल्यास पदाची प्राप्ती होते.
*परंतू तीसर्‍या आणि चौथ्या प्रहरी ऐकल्यास अशुभ संदेश प्राप्त होतात.
*गाव किंवा शहरात कावळ्यांचा कळप दिसल्यास वादाचे कारण निर्मित होतात.
*कावळ्यांचा कळप उच्च स्वरात गोंगाट करत असल्यास संकट आढळू शकतं.
*घरावर कावळे एकत्र होणे मृत्यूतुल्य कष्ट भोगावे लागणार हे संकेत देतात.
*चालत असताना कावळ्याचा स्पर्श आरोग्य आणि जगण्यासाठी अशुभ.
*रात्री कावळ्याचे ओरडणे आणि दिवसाला कोल्ह्याचा आवाज गडबड होण्याचे संकेत देतात.
 
घुबडाची आवाज :
*घुबडाचे रडणे गंभीर संकटाची सूचना करतं.
*घुबडाची आवाज रात्रीच्या प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ प्रहरी ऐकू आल्यास इच्छापूर्तीचे संकेत आहे. याने अर्थ लाभ, व्यापारात लाभ आणि राजदरबार इत्यादी लाभ प्राप्ती होते.
*परंतू एकाच दिशेत घुबडाचा वारंवार आवाज येणे, दिसणे कल्याणकारी नाही. ही संकटाची सूचना आहे किंवा किंवा याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो.
*घुबड वारंवार उच्च स्वरात आवाज काढत असेल तर आर्थिक हानी होण्याचे संकेत आहे.
*रात्रीच्या प्रवासासाठी निघत असताना घुबड प्रसन्नतेने मध्यम स्वरात बोलत असल्यास हे शुभ संकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुष्य नक्षत्रात कोणत्या वंस्तूची खरेदी करायला पाहिजे