Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्होंडाने सादर केली अधिक शक्तिशाली अँक्टिव्हा

Webdunia
मंगळवार, 29 एप्रिल 2014 (16:12 IST)
देशात वेगाने विस्तारत असलेल्या स्कूटर बाजारपेठेवरील पकड अधिक घट्ट करतानाच, ऑटोमॅटिक स्कूटर विक्री करण्यात सर्वात मोठी कंपनी असलेल्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया कंपनीने आपल्या लोकप्रिय अँक्टिव्हा ब्रँडचे अधिक शक्तिशाली स्कूटर मॉडेल भारतीय बाजारात सादर केले आहे. नव्या स्कूटरचे नाव अँक्टिव्हा १२५ असून या स्कूटरची नवी दिल्लीत एक्सशोरूम किंमत ५२४४७ ते ५८१५६ रुपये ठेवण्यात आली आहे.

अँक्टिव्हा १२५ ही खास रचना करण्यात आलेली ऑटोमॅटिक स्कूटर अबाहे. होंडा ब्रँडचे नाव वाढवण्याच्या दृष्टीने या स्कूटरमध्ये बदल करण्यात आले आहेत. बाजारातील आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने अँक्टिव्हाचे हे सुधारित मॉडेल बाजारात सादर केले आहे. स्कूटरला १२५ सीसी इंजिन बसवण्यात आले असून पूर्वीपेक्षा ते अधिक शक्तिशाली इंजिन आहे. ज्याची पॉवर ८.६ ब्रेकहॉर्सपॉवर व इंजिनवेग ६५000 आरपीएम आणि टॉर्क ५५00 आरपीएमला १0.१२ न्यूटनमीटर ठेवण्यात आला आहे. तसेच या इंजिनमध्ये होंडा इको टेक्नॉलॉजी (एचईटी) या खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इंधनज्वलनात सुधारणा होणार असून घर्षण कमी होणार आहे. परिणामी, इंजिनच्या ट्रान्समिशनमध्ये वाढ होणार आहे.  

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments