Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 हजार रुपयांची नोट बंद होण्याची शक्‍यता

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (11:24 IST)
रिझर्व बॅंकेकडून सध्या चलनात असलेली 2 हजार रुपयांची नोट बंद केली जाऊ शकते किंवा या नोटेची छपाई तरी थांबवली जाऊ शकते आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालाच्या आधारे लोकसभेमध्ये अलिकडेच सादर केलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या “इकोफ्लॅश’ अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.
 
मार्च 2017 पर्यंत चलनात असणाऱ्या कमी किंमतीच्या नोटांची संख्या 3,501 अब्ज इतकी आहे. तर 8 डिसेंबरपर्यंत उच्च मूल्ल्याच्या 13,324 अब्ज रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आरबीआयने 8 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या 16,957 दशलक्ष नोटा आणि 2000 रुपयांच्या 3,654 दशलक्ष नोटांची छपाई केली होती. या नोटांचे एकूण मूल्ल्य 15,787 अब्ज इतके आहे.
 
याचा अर्थ उच्च मूल्ल्याच्या 2,463 अब्ज रुपये किंमतीच्या नोटा छापल्या गेल्या मात्र आरबीआयने त्या चलनात आणल्या नव्हत्या. याचा अर्थ एवढ्या किंमतीच्या कमी मूल्ल्याच्या (50 आणि 200 रुपये ) नोटा आरबीआयने छापल्या असल्या पाहिजेत. म्हणजेच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई जाणिवपूर्वक थांबवली असावी किंवा पुरेशी छपाई झाल्यावर कमी छपाई केली असावी, असा अंदाजही या अहवालात वर्तवला आहे.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments