rashifal-2026

शेअर आणि म्युच्युअल फंड आता आधार गरजेचे

Webdunia
तुम्ही जर आर्थिक गुंतवणूकदार असला तर ही महत्वाची बातमी तुमच्या साठी आहे. आता नवीन नियमा प्रमाणे जर तुम्ही  शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुक करत आहात तर त्या करिता  आधार क्रमांक बंधनकारक असणार आहे. असा  निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला आहे. त्यामुळे आता  मुंबई शेअरबाजार (बीएसई) , राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) दोन्ही एक्‍स्चेंजेसना सेबीने असे करावे लागणार आहे असे पत्रच दिले आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे डिमॅट आणि म्युच्युअल फंड खाते 31 डिसेंबरपर्यंत  आधार क्रमांकाशी जोडावे लागणार आहे. तर हे सर्व मुदतीच्या आत संलग्नीकरण करावे लागणार असे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले आहे.
 

शेअरबाजाराचा गैरवापर करून करचुकवेगिरी होऊ नये , हवालामार्गे पैसे जाऊ नयेत याकरीता घेण्यात आला आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत आधार आणि डिमॅट खाते संलग्न केले नाही तर त्यातून आधार कार्ड मिळेपर्यंत व्यवहार होऊ शकणार नाहीत. हा निर्णय फार महत्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये जो बाजारात काळा पैसा गुंतवणूक म्हणून वापरला जातो त्यावर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे सेबीने असा निर्णय घेतला आहे. प्रस्तावावर बीएसई’ने सर्व शेअर दलालांना 23 ऑगस्टपर्यंत म्हणने मांडण्याची मुदत दिली आहे. या भूमिकेला आतापर्यंत ब्रोकर्स , गुंतवणूकदारांनी कसलीही हरकत घेतलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

आधार पीव्हीसी कार्ड काढणे झाले महाग, किती पैसे द्यावे लागतील जाणून घ्या

उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

LIVE: उद्धव ठाकरेंशी युती केल्यामुळे राज ठाकरे अडचणीत! अंधेरी पूर्वेतील शेकडो अधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील

सप्तशृंगी गडावर नवीन मार्ग बांधण्यात येईल, भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल; १.५ कोटी रुपयांचा प्रस्ताव

ओल्या टॉवेलवरून झालेल्या वादामुळे प्रेयसीने तिच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली

पुढील लेख
Show comments