Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'शार्क टँक इंडिया' चे जज अनुपम मित्तल यांना पितृशोक

Anupam Mittal Father Passed Away
Webdunia
Anupam Mittal Father Passed Away उद्योगपती अनुपम मित्तल हे 'शार्क टँक इंडिया' मधील सर्वात लोकप्रिय शार्क आहेत आणि आता शोच्या लोकप्रियतेमुळे ओळखले जातात. उद्योगपती अनुपम मित्तल हे लोकप्रिय व्यासपीठ Shaadi.com चे संस्थापक आहेत. याशिवाय अनुपम मित्तल हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. 
 
अलीकडे व्यावसायिकाने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी आणि हितचिंतकांसाठी एक दुःखद बातमी शेअर केली. त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
अनुपम मित्तल यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी अनुपम मित्तलची पत्नी आंचल कुमारने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक थ्रोबॅक चित्र पोस्ट केले ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र पोज देताना दिसत आहे. हा फोटो कुठल्यातरी कौटुंबिक प्रसंगात क्लिक केलेला दिसतोय. अनुपमने फोटो पुन्हा पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, "शाइन ऑन अस डैडी." 
 
अनुपम नेहमी म्हणतात की ते एक कौटुंबिक माणूस आहे आणि त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये अनुपमला वडिलांची आठवण यायची. एकदा त्यांनी शोमध्ये शेअर केले की त्यांचे वडील हैंडलूम व्यवसायात होते आणि मी त्यांचे बोट धरुन त्यांना मदत करायचो आणि त्यांना पाहत राहयचो. त्याच वेळी व्यवसाय करण्याची कल्पना माझ्या मनात आली. गेल्या वर्षी फादर्स डेच्या दिवशी अनुपमने मुलगी एलिसासोबत केक कापतानाचा वडिलांसोबतचा फोटो अपलोड केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये भीषण आग

पुण्यात उंच इमारतीच्या बाल्कनीतून फुलदाणी पडल्याने एका मुलाचा मृत्यू

रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला

दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेत भारताने 13 सुवर्णपदके जिंकली

पुढील लेख
Show comments