Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनमधील 'या' दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (15:58 IST)
Weibo आणि Baidu Search या चीनमधील दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली आहे. भारताने यापूर्वीही डिजिटल स्ट्राइक करत टिकटॉकसह४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 
 
Weibo हे अ‍ॅप चीनचे ट्विटर म्हटले जाते. तर Baidu Search हे चीनचे स्वत: चे सर्च इंजिन आहे जे गूगलप्रमाणे कार्य करते. भारताने या दोन्ही अ‍ॅपवर बंदी घातली. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.
 
Weibo हे अ‍ॅप ट्विटरप्रमाणे असल्याने २०१५ मध्ये चीनच्या भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते. Weibo च्या एका स्टार युझरपैकी मोदी एक होते. २००९ मध्ये चीनने हे अ‍ॅप सुरू केले होते. या अ‍ॅपचे 50 कोटींहून अधिक युझर आहेत. तर Baidu Search हे अ‍ॅप गुगलप्रमाणे काम करत असल्याने ते भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते.
 
दरम्यान, भारत सरकारने चीनच्या २७५ अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किती योग्य आहेत, याची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर ही अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments