Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holidays in Jun 2023 : जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील

Webdunia
गुरूवार, 25 मे 2023 (16:46 IST)
नवी दिल्ली : आता बँकांशी संबंधित बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. पण तरीही खाते उघडणे, चेक संबंधित काम आणि अशी अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी, तुम्हाला जून 2023 मधील बँकेच्या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत गेलात आणि बँकेला सुट्टी आहे असे घडू नये. या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये विविध झोनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. आठवड्यातील प्रत्येक रविवार व्यतिरिक्त, दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. 24, 25, 26 जून आणि 28, 29, 30 जूनलाही लाँग वीकेंड येत आहे. जून महिन्यात बँकेला कोणत्या तारखेला सुट्ट्या आहेत ते जाणून द्या.
 
जूनमधील बँक सुट्ट्यांची यादी
 
4 जून 2023- रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
 
10 जून 2023- दुसऱ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
 
11 जून 2023- रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
 
15 जून 2023- मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांती आणि YMA दिवसामुळे बँका बंद राहतील.
 
18 जून 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.
 
20 जून 2023- रथयात्रेमुळे मणिपूर आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
 
24 जून 2023- चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
 
25 जून 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.
 
26 जून 2023- खार्ची पूजेमुळे फक्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.
 
28 जून 2023- बकरी ईदनिमित्त या दिवशी महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
 
29 जून 2023- बकरी ईदमुळे देशभरात बँका बंद राहतील.
 
30 जून 2023- मिझोराम आणि ओडिशामध्ये  रीमा  ईद उल अजहा मुळे बँक सुट्टी असेल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments