Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BSNL ने आणला आणखी एक स्वस्त प्रीपेड प्लॅन, दररोज 2 GB डेटासह मोफत कॉलिंग मिळेल

Webdunia
बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (19:39 IST)
टेलिकॉम कंपन्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान आणत असतात. या प्लानमध्ये  सरकारी टेलिकॉम BSNLने यूजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. हा प्रीपेड प्लॅन 187 रुपयांचा आहे. प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटासह अनेक फायदे देत आहे. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या प्लानमध्ये इतर कोणते फायदे दिले जात आहेत. 
 
BSNL च्या 187 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे 
BSNL चा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2 जीबी डेटा देत आहे. प्लॅनचे सदस्य देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये कंपनी मोफत रिंगटोनचा अॅक्सेस देखील देत आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइट किंवा थर्ड-पार्टी वेबसाइट्स/अ‍ॅप्सद्वारे सबस्क्राइब केला जाऊ शकतो. 
 
बाकी कंपन्यांकडे BSNL प्रमाणे 199 रुपयांचा प्लान आहे , Jio सुद्धा आपल्या यूजर्सना असाच प्लान ऑफर करतो. जिओचा हा प्लॅन १९९ रुपयांचा आहे. यामध्ये कंपनी दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. 24 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनी Jio अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. Airtel बद्दल बोलायचे झाले तर कंपनी 199 रुपयांचा प्रीपेड प्लान देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज फक्त 1 GB डेटा मिळेल. 
 
24 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळेल. या प्लानमध्ये कंपनी Amazon Prime Video चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. Vodafone च्या पोर्टफोलिओमध्ये 199 रुपयांचा प्लान देखील आहे. यामध्ये दररोज 1 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दिले जात आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

पुढील लेख
Show comments