Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंदा कोचर अडचणीत, पतीविरुद्ध सीबीआयमध्ये प्रकरण

Webdunia
व्हिडिओकॉन- आयसीआयसीआय प्रकरणात आयसीआयसीआयची सीईओ चंदा कोचर यांच्या समस्या कमी होण्याचे नाव नाही. सीबीआयने या प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर विरुद्ध प्रकरण नोंदवले आहेत.
 
उल्लेखनीय आहे की इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीप्रमाणे डिसेंबर 2008 मध्ये व्हिडिओकॉन समूहाचे मालक वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर आणि त्यांच्या दोन साथीदारांसोबत ज्वाइंट वेंचर बनवले. नंतर कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे लोन काढण्यात आले. नंतर कंपनीचा हक्क मात्र 9 लाख रुपयात त्या ट्रस्टला सोपवण्यात आला ज्याची सूत्र दीपक कोचर यांच्या हातात होती.
 
ज्वाइंट वेंचर हस्तांतरणाने 6 महिन्यापूर्वी व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपये लोन घेतले होते. 2017 साली जेव्हा व्हिडिओकॉनवर 86 टक्के लोन अमाउंट अर्थात 2810 कोटी रुपये शिल्लक होते बँकेने हे अमाउंट एनपीए घोषित केले. आता या प्रकरणात चौकशी समिती धूत-कोचर-आयसीआयसीआय यांच्यात देण-घेण संबंधी तपासणी करत आहे.
 
तसेच आयसीआयसीआयने स्पष्ट केले की त्यांना चंदा कोचरवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि या प्रकाराची अफवा बँकेची इमेज धूमिळ करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व प्रकरणामुळे मागील दहा दिवसात बँकेच्या शेअर प्राइसमध्ये 6 टक्क्यांचा उतार बघण्यात आला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments