लोकसभेत BSNL आणि MTNL होणार का, या प्रश्नावर केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी लेखी उत्तर दिले आहे.
BSNL आणि MTNL बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये बीएसएनलच्या तोट्यात वाढ झाली असून तो 15 हजार 500 कोटी झाला आहे. तर एमटीएनएलला 3 हजार 811 कोटींचा तोटा झाला आहे, अशी माहिती धोत्रे यांनी दिली.
बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये 69 हजार कोटींची योजना जाहीर करण्यात आली होती. यामध्ये कर्मचार्यांवरील वेतन खर्च कमी करणे, स्वेच्छा निवृत्ती योजना, फोरजी सेवेसाठी आर्थिक तरतूद आणि कर्ज कमी करण्यासाठी सार्वभौम रोखे जारी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता, अशी माहिती धोत्रे यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे.