Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chief Minister Uddhav Thackeray: शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

uddhav
, मंगळवार, 17 मे 2022 (18:36 IST)
राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागीलहंगामाच्या तुलनेत2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक  शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे  नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस  गाळप अनुदानाबाबत झालेल्या बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या  हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप  अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विश्व दूरसंंचार दिवस : एक धागा असा की जो आपल्यास अलगद जोडतो