महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.