Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंधन पुरवठा ठप्प टँकरचालकांच्या संपाचा फटका, भाजीपालाही महागला

truck strike
, बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:41 IST)
केंद्र सरकारविरोधात ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. यामुळे राज्यातील इंधन पुरवठ्याला ब्रेक लागला आहे. याचे परिणाम मुंबईतही दिसू लागले असून, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार, अशी माहिती पेट्रोलपंप मालक असोसिएशनने दिली आहे.
 
केंद्र सरकारने नव्याने केलेला रस्ते अपघात सुरक्षा कायदा जाचक व अन्यायकारक असल्याचे सांगत त्याच्या निषेधार्थ मनमाडनजीक पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या तेल कंपन्यांच्या चालकांनी संपाचे अस्त्र उपसल्याने सोमवारी तीनही कंपन्यांतून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडू शकला नाही. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला असून, इंधनटंचाईचे संकट ओढवले आहे.
 
केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व ७ लाख रुपये दंड अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचे म्हणणे आहे. याला टँकरचालकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हा कायदा मागे घेण्यासाठी टँकरचालकांनी सोमवारी सकाळी संपाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला टँकरमालकांनीही पाठिंबा दिला. यामुळे पानेवाडी, नागापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांतून इंधन पुरवठा बंद करण्यात आला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही