rashifal-2026

सर्व इलेक्‍ट्रिक वाहने 2050 पर्यंत शक्‍य

Webdunia
शुक्रवार, 25 मे 2018 (16:55 IST)
भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते 2050 पर्यंत शक्‍य होणार आहे. सरकारने हायब्रीड वाहनाचा पर्याय शिल्ल्क ठेवण्याची गरज असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने म्हटले आहे.
 
कार कंपन्यांना इलेक्‍ट्रिक वाहनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याबरोबर यासाठी वीज निर्मिती आणि चार्जिंग पॉंईटसारखे काम सरकारला करावे लागणार आहे. त्यासाठीही मोठा कालावधी लागणार असल्याने कंपनीचे उपाध्यक्ष शेखर विश्‍वनाथन यांनी सांगितले. त्याबरोबर आगामी काळात इतर तंत्रज्ञानावर आधारित वाहने विकसित होण्याची शक्‍यता आहे. त्या शक्‍यताही खुल्या ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सरकारने जर हायब्रीड कराचा पर्याय खुला ठेवला तर तुलनेने परिस्थिती चांगली राहण्याची शक्‍यता आहे. त्या अवस्थेत सरकारला पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, कंपनीच्या वाहनांना मागणी चांगली आहे. या वर्षी आम्ही 1 लाख 60 हजार वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

३० जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मोठी घोषणा केली

ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये बदलांची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांना सादर केला महत्त्वाचा प्रस्ताव

बजरंग दलाच्या माजी शाखेचे अध्यक्ष यांची जुन्या वैमनस्यातून हत्या; नागपूर मधील घटना

बाळासाहेब आज इथे नाहीत हे बरे झाले! राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र उपहास

LIVE: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट वडेट्टीवार आणि धानोरकर आपापल्या नगरसेवकांशी झाले वेगळे

पुढील लेख
Show comments