Festival Posters

पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:49 IST)

ईपीएफओ पूढील महिन्यात पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. ईपीएफओच्या ५ कोटीहून अधिक ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची नोव्हेंबर महिन्यात बैठक होणार आहे. या निर्णयाबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एक्सचेंज ट्रेडड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ईटीएफ एक प्रकारचं स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक आहे, हे बॉण्डच्या माध्यमातून करण्यात येतं.

कॅगने ईपीएफओच्या या निर्णयाला मंजूरी दिली आहे. श्रम मंत्रालयातील सुत्रांच्या मते, या वर्षाच्या सुरुवातीला सीबीटीच्या बैठकीत हा प्रस्ताव कॅगकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, कॅगने या प्रस्तावावर सहमती दर्शवत काही आक्षेप घेतले आहेत. यावर आगामी बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत ईपीएफओद्वारे ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा ४५ हजार कोटींवर पोहोचणार आहे. ईपीएफओने ईटीएफमध्ये ऑगस्ट २०१५ पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. पूर्वी ५ टक्के गुंतवणूक होती मात्र, आता ही गुंतवणूक वाढून १५ टक्के करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भोपाळमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

BMC Elections निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा यांनी मतदान केले

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

BMC Elections बीएमसी निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी एक मोठी परीक्षा

पुढील लेख
Show comments