उद्योग विश्वात मोठे नाव असलेले अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉममधील कर्मचाऱ्यांची संख्या जबरदस्त घटली असून, तब्बल ९४ टक्के इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांचे जिओ लाँच केल्यापासून कंपनी बाजारात जोरदार चर्चेत असताना आत कंपनीत केवळ ३४०० कर्मचारी राहीले. या कंपनीची कर्मचाऱ्यांची संख्या ५२ हजार होती, ती एकदम घसरली आहे. याबाबत अधिकृत माहिती कंपनीने याबाबतची माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. आता याचा कंपनीच्या उत्पादनांवर आणि सेवांवर मोठा परिणाम दिसून येणार हे नक्की, मात्र अचानक हे कसे झाले असा आपल्याला प्रश्न पडला असेल ना ? अनिल अंबानी यांची कंपनी कर्जबाजारी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे. आरकॉमवर सध्या ४५ हजार करोड रुपयांचे कर्ज आहे. कंपनी २००८ ते २०१० या काळात जोरात असलेली त्यानंतर काही कारणांमुळे अनेक आर्थिक चढउतार आल्याने कंपनीला कर्मचारी कपात केली आहे. जानेवारीमध्ये आपली मोबाईल सेवा बंद केली असून बिझनेस टू बिझनेस स्तरावर दूरसंचार सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. मागच्या काही काळापासून कंपनी बाजारातील आयडीया, व्होडाफोन, एअरटेल यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.