केंद्र सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर नवी सुविधा सुरू केली आहे. प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ITR करता केंद्रीय कमिटीने नवीन फॉर्म सादर केला आहे. हा फोरम सीबीडीटीने सादर केलेला आहे. गेल्यावर्षीच्या फॉर्म पेक्षा तुलनेने अधिक सोपा करण्यात आले आहेत. आयकर भरण्याचा हा फॉर्म अगदी सहज भरता येणार आहे. एका पानाचा हा फॉर्म असून गेल्यावर्षी 3 करोड लोकांनी याचा वापर केला आहे. सीबीडीटीने सांगितले आहे की, व्यक्ती आणि हिंदू अविभाजीत कुटुंबासाठी ज्यांची कमाई हे पारंपरिक पद्धतीने मिळत नाही त्यांच्यासाठी आयटीआर 2 ला जोडलं आहे तर ज्या लोकांना पारंपरिक पद्धतीने व्यवसायातून कमाई मिळते त्यांच्यासाठी आयटीआर 3 आणि आयटीआर 4 हा फॉर्म भरावा लागणार आहे.सीबीडीटीच्या माध्यमातून जाहीर केलेल्या फॉर्ममध्ये करदातांकडून सॅलरी स्ट्रक्चर, प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती अधिक प्रमाणात द्यावी लागणार आहे. त्यामुळे किचकट अशी असणारी व्यवस्था आता सोपी झाली आहे.