Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण

Webdunia
मंगळवार, 2 एप्रिल 2019 (16:19 IST)
'एमजी हेक्टर'मधील अत्याधुनिक कार तंत्रज्ञान केले प्रदर्शित  
प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) ने आयस्मार्ट नेक्स्ट जेनच्या लॉन्चसह भारतात एक अभूतपूर्व अशी टेक्नॉलॉजी सादर केली. आयस्मार्ट नेक्स्ट जेन वैश्विक टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या भागिदारीतून विकसित करण्यात आली आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेनने सुसज्ज एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असेल, जी कनेक्टेड मोबिलिटीचे मूर्त स्वरूप असेल.
 
मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, अनलिमिट,एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील.
 
एमजी हेक्टरचे सर्वात अद्भुत असे फीचर म्हणजे व्हॉईस असिस्ट. हे एक दमदार व्हॉईस अॅप्लिकेशन आहे, जे क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. न्यूआन्सने ते एमजी इंडियासाठी विकसित केलेले असून ते विशेष करून भारतासाठी भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे. यातील बिल्ट-इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे वापर वाढत जाईल तसतशी ही प्रणाली शिकत जाईल आणि अधिकाधिक चांगली होईल. हे व्हॉईस असिस्ट ‘हॅलो एमजी” म्हटल्याने सक्रिय होते व १०० कमांड्स जाणते, ज्यात खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण, नेव्हिगेशन, इ.चा समावेश आहे. तसेच, ते कनेक्टिव्हिटी क्षीण असली तरी काम करते.
 
आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अॅपद्वारा समर्थित आहे. एमजी आयस्मार्ट अॅप मध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी भारतीय बाजारात अजून आलेली नाहीत. प्रत्येक वेळी अॅप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही अशा प्रकारची माहिती त्यात आहे.मालक दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अॅप वापरू शकतात. भारतातील तीव्र हवामान परिस्थितीत हे खूप उपयोगी आहे. हे मालकाला सर्व्हिसचे वेळापत्रक बनवायला देखील मदत करते आणि सर्व्हिस केल्याचा माग देखील ठेवते.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “इंटरनेट आणि कार्सच्या एकत्रीकरणामुळे नव्या फीचर्सचा मार्ग खुला होईल व त्यामुळे भारतातील एमजीच्या ग्राहकांना एक निर्विघ्न आणि अपडेटेड स्वामित्वाचा अनुभव मिळेल. एम्बेडेड सिमकार्ड आणि ओटीएसह एमजी हेक्टर हळूहळू अनेक नवीन गोष्टी करेल, आपल्या क्षमता सतत विस्तारित जो सतत निर्विघ्न ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. शिवाय भारतात ५जी कनेक्टिव्हिटीच्या आगमनाने एमजी कार्स नवीन, अभूतपूर्व फीचर्स दाखल करण्यास सक्षम होईल व त्यामुळे कार ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी सुधारेल.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments