Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना काळात आपली संपत्ती कशी वाढवता येईल, योग्य गुंतवणूक कुठे करावी जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (12:10 IST)
सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वांचेच फार नुकसान झाले आहेत, बहुतांश लोकांचे व्यवसाय बुडाले आहे तर काही जण आपल्या नोकऱ्या गमावून बसले आहे. कोरोना महामारीमुळे केली जाणारी बचत देखील कोलमडली आहे. आता सगळी कडे सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोनाच्या साथी मुळे सर्व बंद पडलेले व्यवहार देखील आता सुरू झाले आहे. व्यापारी वर्ग देखील आपापल्या व्यवहाराला लागले आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यातरी संपलेला नाही. आणि कधी संपणार हे देखील सांगू शकत नाही. 
 
अशात सध्या आपल्या बचतीचं काय करावं हे कळतच नाही. परंतु जेव्हा कोरोनाचा उद्रेक संपेल तेव्हा हा क्षण आपल्याला एका गमावलेल्या संधी सारखा वाटेल. मग आपण आपल्या अतिरिक्त बचतीचे काय करणार ? या महामारीमुळे आपल्याला चांगलाच धडा मिळाला आहे की अचानक झालेल्या घटनांसाठी आपत्कालीन निधी ठेवणं देखील आवश्यक आहे. आपली बचत एखाद्या बँकेच्या खात्यात किंवा कमी जोखमीतील लिक्विड फंडात राखून आपण एक आकस्मिक निधी तयार करा.
 
कंटिजेसी फंड (आकस्मिक निधी) आपले संरक्षण करू शकते - वैयक्तिक खर्चासाठी 24 महिन्याचा हा कंटिजेसी फंड किंवा आकस्मिक फंड अश्या अनपेक्षित परिस्थितींमध्ये आपले संरक्षण करू शकते. आकस्मिकता निधीची संकल्पना समजून घेणारे लोकं घर चालविण्यासाठीच्या एक किंवा दोन महिन्यांचा मासिक खर्च वाचवून प्रारंभ करू शकतात. महामारीच्या या दरम्यान आपल्या आर्थिक ध्येयांचा पुनः विचार करावा.
 
पोर्टफोलिओ मध्ये संतुलन ठेवा - आपल्या सध्याच्या गरजांची काळजी घ्या, परंतु अश्या पोर्टफोलिओ किंवा फंड तयार करण्याकडे लक्ष द्या, जे कोणत्याही परिस्थितीत आपले संरक्षण करू शकेल. या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. उदाहरणार्थ कोविड -19 महामारी किंवा साथीच्या रोगांनी कदाचित काही वेळा साठी आर्थिक क्रियाकलाप आणि जीवनात अडथळा आणला आहे. शक्यता आहे की आपण या पूर्वी जी गुंतवणूक केली आहे, ती भविष्यात कामी येऊ शकणार नाही. आवश्यक असल्यास आपण आपल्या पोर्टफोलिओला पुन्हा संतुलित करा.
 
जोखमीच्या क्षमतेचं पूर्णपणे मूल्यांकन करा - क्वांटम म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना सूचित करते की आपण उपलब्ध संधी बघा आणि योजना आखून मालमत्तेच्या वाटपासाठी समजूतदारीनं आपले पैसे कसे गुंतवायचे याचा निर्णय घ्या. आपली मालमत्ता वाटप पुन्हा संतुलित करण्यापूर्वी आपल्या क्षमतेची चाचणी घ्या. आणि शेवटी, आपल्याला असे वाटेल की आपल्याला आपल्याच पैशांची पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी मानसिकरीत्या कमी कष्ट करावे लागले. 
 
पण महामारी किंवा साथीच्या या रोगाच्या उद्रेक दरम्यान आपल्या कमाईला वाढविण्यासाठी निरोगी राहणं खूप आवश्यक आहे. कुठे ही बाहेर जाताना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना पाळा आणि सावधगिरी बाळगा. आपली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि आपण आनंदी राहा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख
Show comments