Publish Date: Fri, 11 Jan 2019 (08:52 IST)
Updated Date: Fri, 11 Jan 2019 (08:54 IST)
१० जानेवारीपासून jio phone-२ या स्मार्ट फिचर फोनची फ्लॅश सेलच्या माध्यामातून विक्री सुरु होणार आहे. हादुपारी १२ पासून सुरु झाला आहे. हा स्मार्ट फिचर फोन ग्राहकांना jio.com या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. या jio phone-२ स्मार्ट फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ इतकी आहे.
या jio phone- २ ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मोबाईलचे डिझाइन तसेच याचा की-बोर्ड हा क्वेर्टी आहे. या मोबाईलचा रॅम ५१२ mb आहे. तर इंटरनल स्टोअरेज ४ जीबी इतके आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. हा स्मार्ट फिचर फोन २ kai os या प्रणालीनुसार काम करणार आहे. या मोबाईलची बॅटरी पॉवर २ हजार mh इतकी आहे.