Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लाईटची तिकिटं बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा कमी किमतीत तिकिटं मिळतील

फ्लाईटची तिकिटं बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा कमी किमतीत तिकिटं मिळतील
Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (21:40 IST)
कोरोनाची भीती आता लोकांच्या मनातून जाऊ लागली आहे आणि नवीन वर्ष येतातच लोक पुन्हा एकदा हवाई मार्गाने प्रवास करू लागले आहे. या दरम्यान लोकांच्या मनात आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विविध एयरलाईन्स ने फ्लाईट्सच्या किमतीत वाढ केली आहे. बऱ्याच एयरलाईन्स वेबसाइट्स ऑनलाईन बघितल्यावर किमतीत वाढ दिसते. आजकाल बहुतेक लोक फ्लाईट्स ची बुकिंग ऑनलाइनच करत आहे. अशा परिस्थितीत आपण देखील कमी किमतीत फ्लाईटची तिकिटे मिळवू इच्छिता तर पुढील दिलेल्या माहितीला आवर्जून वाचा. 
 
1 क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरा- 
 फ्लाईट्सची तिकीट बुक करताना बरेच लोक क्रेडिट कार्ड असताना देखील त्याचा वापर करत नाही. या मागील कारण असं देखील असू शकत की त्यांना या कार्डाच्या मार्फत मिळणाऱ्या फ्लाईटशी निगडित ऑफर्स बद्दल ची माहिती नसते. म्हणून ते इतर कोणतेही  माध्यम अवलंबवतात. म्हणून फ्लाईट्सची  तिकीट ऑनलाईन बुक करताना किमान एकदातरी प्रयत्न करून आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डावरील फ्लाईट्सशी निगडित असलेल्या ऑफर्स ची माहिती बघून घ्या.   
 
2 इनकॉग्निटो मोडमध्ये बुक करा- 
बऱ्याच वेळा जेव्हा आपण फ्लाईट्सच्या किमती बघतो तेव्हा त्यांच्या किमती वेगवेगळ्या असतात. दुसऱ्यांदा बघताना किमती वेगळ्या असतात. म्हणून अशा प्रकारची समस्या टाळण्याचा प्रयत्न करा. या साठी आपण इनकॉग्निटो मोड मध्ये जाऊन आपल्या फ्लाईट्सची तिकिटे बुक करा. जर आपण ब्राउझर वरच किमती बघत राहाल तर मागणी वाढल्यामुळे हे वाढलेले दिसतील. 
 
3 प्रिमियम सीटच्या आमिषाला बळी पडू नका-
एयरलाइन्स वेबसाइट्स बऱ्याच वेळा आपल्याला प्रिमियम सीटच्या डिस्काउंट्सच्या ऑफर्सचे आमिष देतात. प्रिमियम सीटच्या किमती देखील जास्त असतात. अशा प्रकारे जर त्यांनी काही सवलत दिली आहे तर ती आपल्याला महागच पडणार नाही  तर सामान्य सीटच्या तुलनेत किंमत जास्त येणार म्हणून अशा आमिषांना बळी न पडता आपण जे ठरविले आहे त्यानुसारच फ्लाईट्सची तिकिटं बुक करा.
 
4 अखेरच्या आठवड्याला प्रवास करू नका-  
शुक्रवार ते सोमवारी सकाळी फ्लाईट्सचे तिकिटे महागच असतात कारण या दिवसात बरेच लोक प्रवास करतात म्हणून आपण आपल्या प्रवासाची योजना अशी आखा की या दिवसात प्रवास करण्यापासून वाचावं. आपण फ्लाईट्सच्या कमी किमतीत आरामात मंगळवार,बुधवार,गुरुवारी प्रवास करू शकता.सणासुदीच्या काळात देखील फ्लाईट्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

इजिप्तच्या किनाऱ्याजवळ पर्यटक पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू

का एका महिला IAS ने आईला विचारले; पुन्हा पोटात ठेवून गोरं बनवू शकते का?

दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार... आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत संजय निरुपम यांनी केले गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments