Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LPG Subsidy घरगुती गॅस सिलिंडरवर पुन्हा सब्सिडी! खात्यात येत आहे पैसे, या प्रकारे चेक करा

Webdunia
मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (16:24 IST)
जर आपणही एलपीजी यूज करत आहात तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. एलपीजी सब्सिडी (LPG Gas Subsidy) आता ग्राहकांच्या खात्यात येऊ लागली आहे. तसं तर पूर्वीही एलपीजी सब्सिडी येत होती, परंतु अनेक ग्राहकांच्या खात्यात सब्सिडी येत नसल्याची तक्रार मिळत होती. आता पुन्हा सब्सिडी सुरु झाल्यावर तक्रारी बंद व्हायला लागल्या आहेत.
 
अनुदानाबाबत संभ्रम
एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर 79.26 रुपये अनुदान म्हणून दिले जात आहे. पण, ग्राहकांना वेगवेगळी सबसिडी मिळत आहे. अशा स्थितीत किती पटींनी अनुदान मिळते, असा संभ्रम लोकांमध्ये आहे. वास्तविक, अनेकांना 79.26 रुपये अनुदान मिळत आहे, तर अनेकांना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये अनुदान मिळत आहे. तथापि, सबसिडी तुमच्या खात्यात आली आहे की नाही, तुम्ही ती सोप्या प्रक्रियेने तपासू शकता.
 
घरी बसल्या चेक करा 
तुम्ही घरबसल्या तुमच्या खात्यातील अनुदान सहज तपासू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या खात्यात सबसिडी आली आहे की नाही हे तुम्ही काही मिनिटांत सहज कसे जाणून घेऊ शकता.
 
या खात्यात अनुदान तपासा
1. सर्व प्रथम www.mylpg.in उघडा.
 
2. आता तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
 
3. येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
 
4. यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल.
 
5. आता वरच्या उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर टॅप करा.
 
6. तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असेल, तर साइन-इन करा. जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर तुम्ही New User वर टॅप करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
 
7. आता तुमच्या समोर विंडो उघडेल, उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर टॅप करा.
 
8. तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी दिली गेली आणि कधी दिली गेली याची माहिती इथे मिळेल.
 
9. यासोबतच, जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही फीडबॅक बटणावर क्लिक करू शकता.
 
10. आता तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याची तक्रार देखील दाखल करू शकता.
 
11. याशिवाय, तुम्ही या टोल फ्री क्रमांक 18002333555 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
 
सबसिडी का थांबते?
तुमची सबसिडी आली नसेल तर तुमची सबसिडी का थांबली आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एलपीजीवरील सबसिडी बंद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलपीजी आधार लिंकिंगची उपलब्धता नसणे. आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांनाही सबसिडी दिली जात नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments