Festival Posters

Mahindra Scorpio N : लॉन्च होण्यापूर्वी वैशिष्ट्य जाणून घ्या

Webdunia
रविवार, 26 जून 2022 (15:29 IST)
Mahindra Scorpio N Variants And Features: महिंद्रा अँड  महिंद्रा पुढील आठवड्यात त्यांच्या नेक्स्ट जनरेशनची स्कॉर्पिओ ची किंमत जाहीर करणार आहे. लोक बऱ्याच काळापासून Scorpio-N ची वाट पाहत आहेत. आत्ता, 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-N लाँच होण्याआधी, त्याचे सर्व डिझेल आणि पेट्रोल व्हेरियंट आणि त्यांच्या ट्रान्समिशन पर्यायांसह लुक आणि वैशिष्ट्यांशी संबंधित सर्व तपशील जाणून घ्या.
 
Scorpio-N च्या 5 ट्रिम लेव्हलचे एकूण 36 व्हेरियंट 27 जून रोजी भारतात लॉन्च केले जाईल.
 Z2, Z4, Z6, Z8 आणि  Z8L असे एकूण 36 प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल, त्यापैकी 23 प्रकार डिझेल मॉडेलचे आणि 13 प्रकार पेट्रोल मॉडेलचे असतील. Scorpio-N च्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 7 मॅन्युअल आणि 6 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील तर Scorpio-N डिझेलमध्ये एकूण 13 मॅन्युअल आणि 10 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ 6 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Mahindra Scorpio Classic S3+ आणि S11 या 2 प्रकारांमध्ये विकले जाईल, जे 7 आणि 9 सीटर पर्यायांमध्ये असतील.
 
नवीन Mahindra Scorpio N, 4.6 मीटर लांब SUV च्या लुक आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, ही मध्यम आकाराची SUV 4,662mm लांब, 1,917mm रुंद आणि 2,780mm उंच असेल. ही SUV 17 आणि 18 इंच आकाराच्या चाकांसह सादर केली जाईल. रिअर व्हील ड्राइव्ह तसेच ऑल व्हील ड्राइव्ह पर्यायामध्ये येत असलेल्या या एसयूव्हीमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, अॅडजस्टेबल सीट्स, सोनीची प्रीमियम साउंड सिस्टम, अनेक एअरबॅगसह अनेक मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये दिसतील.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मध्य प्रदेश : देवासमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण दुर्घटना, ३ जणांचा मृत्यू

मुंबईतील ज्या दुकानांवर आणि कार्यालयांवर मराठी फलक नाहीत, ती आता अडचणीत येणार; बीएमसीचा एक महिन्याचा अल्टिमेटम

LIVE: मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालयांवर मराठी फलक लावणे बंधनकारक; बीएमसीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिला

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला

नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले; न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला

पुढील लेख
Show comments